शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाला गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण

By admin | Updated: December 1, 2014 22:51 IST

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाद्वारेही मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी एवढेच नाही तर,

साईनाथ कुचनकार - चंद्रपूरजिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाद्वारेही मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी एवढेच नाही तर, शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांकडून प्रयत्न सुरु आहे. मात्र त्यांचे प्रयत्न जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कमी पडण्याची शक्यता आहे. पंधरा पंचायत समितीपैकी तब्बल १२ पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी प्रभारी आहे.जिल्हा परिषदेद्वारे चालविण्यात येणाऱ्या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. तो दर्जा सुधारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे. यासाठी विविध उपाययोजनाही सुरु करण्यात आल्या आहे. कोणत्याही परिस्थिती खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी पडता कामा नये, यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. एवढेच नाही तर शिक्षकांना विविध विषयांचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणीसाठी एकाच दिवशी काही तालु्क्यातील विद्यार्थ्यांची परीक्षाही घेण्यात आली. त्याचा निकाल अद्याप लागला नाही. निकालानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. हे सर्व ठिक असले तरी जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षक यांच्यातील दुवा असलेल्या जिल्ह्यातील १५ पैकी १२ गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. रिक्त असलेले पद प्रभारींच्या भरोवश्यावर आहे. प्रभारी अधिकारी असल्याने त्यांचा प्रशासकीय कामावर पाहिेजे तसा वचक नाही. एवढेच नाही तर येथेही सेवाज्येष्ठतेला तिरांजली देण्यात आली आहे. मनमर्जीप्रमाणे प्रभार देवून ज्येष्ठांना डावलण्यात आल्याचा प्रकारही घडत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे. या प्रकारामुळे प्रभारी अधिकाऱ्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत सध्या शिक्षक नाही. त्यामुळे जिल्हा स्तरावरून आखण्यात आलेल्या विविध गुणवत्ता विषयक तसेच अन्य योजना प्रभावीपणे राबविण्यात अडचण निर्माण होत आहे. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचे अधिकारी बघत असलेले स्वप्न भविष्यात अधुरे राहतील की काय, असा प्रश्न आता नागरिकांत विचारला जात आहे.