शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

सिलिंडर देणाऱ्यास विचारा, लस घेतली का, अनेक जण लसीकरणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:21 IST

चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाखांहून अधिक घरगुती गॅस वापरणाऱ्यांची संख्या आहे. यातील दीड लाखाहून अधिक ग्राहक हे शहरी भागात ...

चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाखांहून अधिक घरगुती गॅस वापरणाऱ्यांची संख्या आहे. यातील दीड लाखाहून अधिक ग्राहक हे शहरी भागात राहणारे आहेत. या सर्वांना भारत गॅस, एचपी, इंडेन गॅस अशा कंपन्याच्या माध्यमातून घरपोच गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. घरोघरी गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्यांची संख्या ३०० च्या जवळपास आहे. यातील काही जण बाधित झाले होते. परंतु, बहुतेकांचे लसीकरण अद्यापही करण्यात आले नाही. यांना दररोज अनेकांच्या घरी जाऊन घरपोच सिलिंडरचा पुरवठा करावा लागत असल्याने अनेकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी तिसऱ्या लाटेच्या पूर्वी लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

-

सिलिंडर सॅानिटाईज केले का?

कोणालाही ओझे उचलावे वाटत नाही. त्यामुळे घरातील मंडळी किचनमध्ये सिलिंडर ठेवण्याची विनंती त्याला करीत असतात. नेहमीचेच संबंध असल्यामुळे डिलिव्हरी बाॅयदेखील किचनपर्यंत सिलिंडर नेऊन देतो. परंतु, सिलिंडर सॅनिटाईझ करून घेण्याची कोणीही तसदी घेत नाही.

बॉक्स

अनेक जण आढळले पॉझिटिव्ह

चंद्रपूर शहरात घरपोच गॅस पोहोचता करणाऱ्यांची संख्या ३०० च्या जवळपास आहे. त्यापैकी काही जणांना कोरोनाची बाधा झाली होती. परंतु, आजपर्यंत अनेकांना लस उपलब्ध झाली नाही. घरोघरी सेवा देणाऱ्या या वितरकांसह गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

बॉक्स

जबाबदारी कुणाची?

चंद्रपूर जिल्ह्यात गॅस वितरित करणाऱ्या तसेच इतर जीवनावश्यक साहित्य, तसेच खाण्याचे पदार्थ व इतर सेवा घरपोच देणाऱ्या वितरकांना डिलिव्हरी बॉयला लसीकरण देण्याची जबाबदारी कुणाची आहे, तसेच त्यांची वेळोवेळी कोरोना तपासणी केली जाते काय, असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होत आहेत. बहुतेक घरपोच सेवा देणारे आजही मास्क, सॅनिटायझरचा वापर करताना दिसून येत नाही. त्यामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोट

डिलिव्हरी बॉय म्हणतात...

१८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर काही दिवसातच ही मोहीम बंद झाली. त्यामुळे माझे लसीकरण करण्यात आले का याबाबत कुठल्याही संबंधित अधिकाऱ्यांनी विचारणा केली नाही. माझे लसीकरण व्हायचे आहे.

---गॅस वितरक

------

मास्क घालूनच सिलिंडरचा पुरवठा करीत असतो. आम्ही अनेकांच्या संपर्कात येत असल्याने आम्हाला लसीकरण करणे गरजेचे होते. मात्र १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण बंद झाल्याने माझे लसीकरण व्हायचे आहे.

-गॅस वितरक

बॉक्स

अशी आहे आकडेवारी

शहरातील एकूण घरगुती गॅसधारक १,५०,०००

गॅस वितरित करणाऱ्या एजन्सी ८

घरपोच डिलिव्हरी करणारे कर्मचारी ३००