शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अजगराच्या अंड्यांतून कृत्रिम पद्धतीने चार पिल्लांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:00 IST

चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत अंतरगाव पारडवाही येथील वासुदेव गजानन चौखुंडे यांच्या शेतात एक अजगर आपल्या अंड्यांसोबत होता.  ही माहिती क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके व वनरक्षक सुभाष मरसकोल्हे यांना देण्यात आली. वनकर्मचारी व संजीवन संस्थेच्या सदस्यांनी  चौखुंडे यांना अजगराला अंड्यांतून पिल्ले निघेपर्यंत तिथेच राहू देण्याची विनंती केली; पण भीतीपोटी त्यांनी अजगराला शेतात राहू देण्यास असमर्थता दर्शवली.

ठळक मुद्देचिचपल्ली वनपरिक्षेत्रातील एका शेतात आढळले होते अजगराचे अंडे

भोजराज गोवर्धनलोकमत न्यूज नेटवर्कमूल : शेताच्या पाळीवर अजगरासह अंडी असल्याची माहिती वासुदेव चौखुंडे या शेतकऱ्याने येथील संजीवन पर्यावरण संस्थेला दिली. संस्थेचे अध्यक्ष उमेषसिंह झिरे यांनी शेतात जाऊन अजगराला पकडून जंगलात निसर्गमुक्त केले आणि अंड्यांतून कृत्रिम पद्धतीने चार पिल्लांना जन्म दिला.  अजगराच्या सर्व पिल्लांनाही बुधवारी निसर्गमुक्त केले. कृत्रिम पद्धतीने अजगराच्या पिल्लांना जन्म दिल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत अंतरगाव पारडवाही येथील वासुदेव गजानन चौखुंडे यांच्या शेतात एक अजगर आपल्या अंड्यांसोबत होता.  ही माहिती क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके व वनरक्षक सुभाष मरसकोल्हे यांना देण्यात आली. वनकर्मचारी व संजीवन संस्थेच्या सदस्यांनी  चौखुंडे यांना अजगराला अंड्यांतून पिल्ले निघेपर्यंत तिथेच राहू देण्याची विनंती केली; पण भीतीपोटी त्यांनी अजगराला शेतात राहू देण्यास असमर्थता दर्शवली. घटनेची माहिती चंद्रपूर वनविभागाच्या विभागीय वनाधिकारी सारिका जगताप, साहाय्यक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावाड व चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांना देण्यात आली. क्षेत्र साहाय्यक प्रशांत खनके, वनरक्षक सुभाष मरसकोल्हे यांच्या उपस्थितीत संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार, तन्मयसिंह झिरे, मनोज रणदिवे, स्वप्निल आक्केवार, प्रशांत केदार, अंकुश वाणी, दिनेश खेवले यांनी अजगराला सुरक्षितपणे पकडले व अजगराची अंडी ताब्यात घेतली. अजगराला वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे कक्ष क्रमांक ७५१ मध्ये निसर्गमुक्त केले. अजगर सापाच्या अंड्याला वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास दीड महिना त्या अंड्यांची योग्य काळजी घेतल्यानंतर पंधरा ते सोळा अंड्यांतून २० जुलै रोजी अजगराची चार पिल्ले बाहेर निघाली. या घटनेमुळे  आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कृत्रिमरीत्या अजगराची अंडी उबवून पिल्ले निघण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. अजगराच्या चारही पिल्लांना वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ५२२ येथील नाल्याशेजारी सुरक्षितपणे सोडण्यात आले. यावेळी वनरक्षक सुभाष मरसकोल्हे,  उमेशसिंह झिरे, स्वप्निल आक्केवार, तन्मयसिंह झिरे, अंकुश वाणी, दिनेश खेवले, चेतन बोकडे, जय मोहुर्ले, रितेश पीजदूरकर, हर्षल वाकडे, अनुराग मोहुर्ले, रूपेश खोब्रागडे, अक्षय दुम्मावार उपस्थित होते.

 

टॅग्स :snakeसाप