शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिंपरीत कृत्रिम पाणी टंचाई

By admin | Updated: May 12, 2016 01:07 IST

शासनाने जनसामान्यांच्या गरजा लक्षात घेता प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी नळयोजना कार्यान्वित केल्या.

नागरिक त्रस्त : नगर पंचायत प्रशासनाने लक्ष द्यावेगोंडपिपरी : शासनाने जनसामान्यांच्या गरजा लक्षात घेता प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी नळयोजना कार्यान्वित केल्या. यासाठी शासनाने प्रादेशिक, ग्रामीण व जल प्राधिकरणाच्या अनेक योजनांमार्फत कोट्यवधींचा निधी खर्चून जनतेला पाणी पुरविण्याचे कार्य होत आहे. मात्र दुसऱ्याच्या हक्कावर गदा आणण्याच्या कुप्रथेमुळे आता जनसामान्यांना पिण्याचे पाणी मिळणे दिवसेंदिवस अवघड होत असल्याचा प्रत्यय गोंडपिंपरी शहरात दिसून येत आहे. शहरात नगरपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेमार्फत नागरिकांपर्यंत पाणी पोहोचविल्या जाते. मात्र याच नळ योजनेतील काही नळ कनेक्शन धारकांनी शुद्ध पाणी साठवणुकीसाठी टिल्लू पंपाच्या वापरातून अतिरिक्त पाणी उपसत असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना पिण्याचे पाणी मिळणे अवघड जात आहे. तालुक्यातील कूपनलिका व विहिरींच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांच्या आरोग्यास विपरीत परिणाम होत आहे. या कूपनलिका व विहीरीच्या पाण्यामुळे विविध आजार होत असल्याने नळ योजनेद्वारे मिळणाऱ्या पाण्याची मागणी अधिक आहे. शहराचा पाणी पुरवठा येनबोथला नदीवरून तर शुद्धीकरण सुरगाव येथून होत असल्याने शहरातील प्रभाग १, २ व ३ या प्रभागातून पाणी वाटपाला सुरूवात होते. तर प्रभाग ४, ५, ६ ७ व ८ या प्रभागामध्ये सार्वजनिक नळ, बाजारपेठ व दाट वस्ती असल्याने येथे मुबलक पाणी पुरवठा करणे व ९ ते १७ या प्रभागापर्यंत पाणी पोहचविणे हे नळ योजनेचे उद्दिीट आहे. मात्र नदीपासून येणाऱ्या जलवाहिन्यांमधून नेहमीच पाणी गळती तर शहराच्या मध्यभागातून व शेवटपर्यंत असलेल्या लोकवस्तीतील काही टिल्लू पंपधारक या नळयोजनेच्या प्रणालीत अडथळा निर्माण करतात. अनेक नागरिक अतिरिक्त पाणी उपसा करण्यात यशस्वी ठरत आहेत. परिणामी इतर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची पाळी आहे. या संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी नगर पंचायतीने या विरोधात ठोस पाऊस उचलून टिल्लू पंपधारकांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र असे असले तरी नगरपंचायतीच्या कारवाईला न जुमानता काहींकडून आजही नळयोजनेच्या पाण्याचा गैरकायदेशीर उपसा सुरूच आहे. परिणामी शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना कारवा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)