शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तिमत्त्व विकासासाठी कलेची देवाणघेवाण आवश्यक

By admin | Updated: January 19, 2017 00:55 IST

माणूस कितीही मोठा झाला तरी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विद्यार्थीच असतो.

चंदनसिंह चंदेल यांचे प्रतिपादन : बल्लारपुरात समारंभबल्लारपूर : माणूस कितीही मोठा झाला तरी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विद्यार्थीच असतो. सुरुवातीला तो घरातून नंतर शाळेतून तद्नंतर समाजातून शिक्षण घेत असतो. यातून त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होत असतो. या कलागुणांची देवाण-घेवाण व्यक्तीमत्त्व विकासासाठी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.महाराजा लॉन येथे किरणाश्रय सामाजिक संस्थेतर्फे आयोजित ‘चला वाटू या वाण कलागुणांचे’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प. उपाध्यक्ष मीना चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून किरणाश्रयच्या अध्यक्षा किरण बुटले, नगरसेविका रेणूका दुधे, ज्योती भूते, अश्विन मुसळे, रणजित डवरे, प्रशांत विघ्नेश्वर, मधु कपूर, मंगेश देशमुख, जयश्री मोहूर्ले, आशा संगीडवार, पूनम निरंजने, सुवर्णा भटारकर, सारिका कनकम, सोनम सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समाजसेविका मधू कपूर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व विषद केले. प्रास्ताविकात किरणाश्रयच्या अध्यक्षा किरण बुटले यांनी संस्थेचे उद्देश विषद केला. त्यानंतर अन्य पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नृत्य, गायन, योगा, नाटिका आदी स्पर्धा पार पडल्या. यावेळी लोणचे, आवळ्याचे पदार्थ, विविध प्रकारचे सरबत बनविण्याचे प्रशिक्षण शेख यांनी दिले. संचालन मिना झाडे यांनी तर आभार शुभांगी भेंडे यांनी आभार मानले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)