शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

कला, संस्कृती वृद्धिंगत व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:26 IST

समाजाला आनंद देण्याची शक्ती कलेमध्ये आहे. त्यामुळे तुमच्या कलागुणांच्या माध्यमातून समाजाच्या मनाचा जीडीपी मोजता आला पाहिजे. त्यांचे पर कॅपिटा समाधान मोजता आले पाहिजे. त्यामुळे समृद्ध, समाधानी महाराष्ट्र उभारण्याचे, महाराष्ट्राची कला, संस्कृती टिकविण्याचे चिंतन दोन दिवसांच्या कला शिक्षण परिषदेत झाले पाहिजे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वने तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : समस्यांवर मार्ग काढण्यासाठी शिक्षण मंत्र्यासमवेत बैठक घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समाजाला आनंद देण्याची शक्ती कलेमध्ये आहे. त्यामुळे तुमच्या कलागुणांच्या माध्यमातून समाजाच्या मनाचा जीडीपी मोजता आला पाहिजे. त्यांचे पर कॅपिटा समाधान मोजता आले पाहिजे. त्यामुळे समृद्ध, समाधानी महाराष्ट्र उभारण्याचे, महाराष्ट्राची कला, संस्कृती टिकविण्याचे चिंतन दोन दिवसांच्या कला शिक्षण परिषदेत झाले पाहिजे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वने तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे संलग्न असणाऱ्या चंद्रपूर जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने ४४ व्या राज्यस्तरीय कला शिक्षण परिषदेचे आयोजन स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहामध्ये करण्यात आले आहे. २९ व ३० डिसेंबर या कालावधीमध्ये हे संमेलन होत आहे. सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये दोन दिवस चालणाºया या संमेलनांमधून महाराष्ट्राच्या कला संस्कृतीला चालना मिळावी, नव्या ध्येय - धोरणासाठी याठिकाणी चिंतन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणत्याही प्रदेशाची ओळख त्या प्रदेशातील कला, संस्कृतीमुळे होत असते. जगाला केवळ आता कलेने जिंकता येते. त्यामुळे आपल्या प्रदेशाची ओळख ही येथील कला व कलाकारांमुळे असते. तुम्ही केलेल्या कलाकृती अजरामर राहणार असून तीच खरी कलाकाराची ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कलेची कोणतीही जात,धर्म वा कुठलाही भेदाभेद नसतो. समाजाच्या समाधानाचा उत्कर्ष कलेमध्ये असतो. त्यामुळे तो वृद्धिंगत करणे आपल्या हाती असल्याचे त्यांनी सांगितले.स्वागताध्यक्ष प्रफुल्ल सावंत यांनी सुरुवातीला कला शिक्षकांच्या समस्या व्यक्त केल्या. याबाबत आपल्या स्वागताध्यक्षीय भाषणामध्ये ऊहापोह करताना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील कला शिक्षकांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले. राज्य शासन हे कला शिक्षकांच्या पाठीशी असून त्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणेचे अध्यक्ष पी. आर. पाटील, सामाजिक नेते किशोर जोरगेवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.कला शिक्षकांच्या नियुक्त्यात खंड नको-सावंतयावेळी कार्यक्रमाचे उदघाटक सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी संबोधित केले. महाराष्ट्राची ओळख कला संस्कृतीमुळे होत असतानासुद्धा कलाशिक्षक यांच्या नियुक्त्यांमध्ये खंड पडू नये ,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कलाशिक्षकांची मुबलक उपलब्धता व त्यांच्या सोयी सवलतीकडे लक्ष वेधण्याचे आवाहनही प्रफुल्ल सावंत यांनी केले.