शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एआरटी केंद्रात एका महिन्यात १४९ रुग्णांची नोंद

By admin | Updated: August 10, 2015 00:42 IST

एचआयव्ही बाधित रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात औषधी उपचार व नियमित तपासणी करून सल्ला मिळावा याकरीता ...

वरोरा येथे केंद्र : चंद्रपूरसह यवतमाळ जिल्ह्यातील रूग्णांना मिळतेय लाभवरोरा : एचआयव्ही बाधित रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात औषधी उपचार व नियमित तपासणी करून सल्ला मिळावा याकरीता वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात अ‍ॅन्टी रिरोवायरल थेरीपी (एआरटी) सेंटर स्थापन करण्यात आले. स्थापनेपासून एक महिन्याच्या कालावधीत तब्बल १४९ रुग्णांची नोंद या सेंटरमध्ये झाली असून त्या रुग्णांची तपासणी व औषधोपचार सुरू झाला आहे. वरोऱ्यातील एआरटी सेंटर हे चंद्रपूर जिल्ह्यातील दुसरे सेंटर असून यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे.चंद्रपूर सामान्य रुग्णालयात सर्वप्रथम एआरटी सेंटर स्थापन करण्यात आले. या सेंटरवर चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील एचआयव्ही बाधीत रुग्ण औषधी उपचाराकरिता जात होते. जिल्ह्यात एकमेव एआरटी सेंटर असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली होती. सोबतच चंद्रपूरला जाणे यवतमाळ जिल्ह्यातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, माजरी, चिमूर येथील रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने तसेच गैरसोयीचे होत होती. त्यामुळे अनेक एचआयव्ही बाधित रुग्ण औषधी उपचार व सल्ल्यापासून वंचीत राहत होते. यामुळे वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात एआरटी सेंटरची स्थापना करण्यात आली. एका महिण्यात या सेंटरची माहिती परिसरात पसरताच १४९ रुग्ण जुळले आहेत. या रूग्णांवर औषधोपचार व नियमीत तपासणी करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)रूग्ण जोडण्याची कार्यवाही सुरूवरोराच्या सेंटरमध्ये तपासणी, मार्गदर्शन व औषधी उपचार नियमीत केला जात आहे. याकरीता स्वतंत्र युनीट तयार करून त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. वरोरा येथील एआरटी सेंटरला वरोरा, भद्रावती, चिमूर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव आदी तालुक्यातील एचआयव्ही बाधीत रुग्ण जोडण्यात येणार असून सेंटरला रुग्ण जोडण्याची तयारी सुरू आहे.