शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील कलासौंदर्य प्रवाशांनीही जपण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:12 IST

ताडोबा जंगलातील पशू पक्षी, वनवैभव, आदिवासींची जीवनशैली याबाबत चित्र रंगवून आणि प्राण्यांचे, त्यांच्या कळपासह पुतळे फलाटावर मोक्याच्या जागी उभे करून बल्लारपूर (बल्लारशाह) रेल्वे स्थानकाला सजवून शोभिवंत केले आहे.

ठळक मुद्देदररोज प्रवाशी काढतात छायाचित्रे : पर्यटकांना होत आहे निसर्गभ्रमंतीचा आभास

वसंत खेडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : ताडोबा जंगलातील पशू पक्षी, वनवैभव, आदिवासींची जीवनशैली याबाबत चित्र रंगवून आणि प्राण्यांचे, त्यांच्या कळपासह पुतळे फलाटावर मोक्याच्या जागी उभे करून बल्लारपूर (बल्लारशाह) रेल्वे स्थानकाला सजवून शोभिवंत केले आहे. हे सौंदर्य अबाधित रहावे यासाठी आता रेल्वे प्रशासन व प्रवाशांनी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.भारतीय रेल्वे प्रशासनाने बल्लारपूर रेल्वे स्थानकाचा देशातील सर्वात सुंदर व देखणे रेल्वेस्थानक म्हणून गौरव केला आहे. ही अत्यंत गौरवाची गोष्ट असून यामुळे या रेल्वे स्थानकाकडे प्रवाशी आकर्षिले जात आहेत. सामान्य लोकांनाही येथील नाविन्यपूर्ण सौंदर्य बघण्याची उत्कंठा आहे. या रेल्वे स्थानकावरून जाणारी प्रत्येक गाडी दहा ते पंधरा मिनीटपर्यंत येथे थांबतेच! या अवधीत गाडीमधील हौशी आणि कलाप्रेमी प्रवाशी फलाटावर उतरून या चित्र सौंदर्याचे पुतळ्यांचे अवलोकन करून त्यांचे फोटो काढतात. सेल्फी चित्र घेतात. अतुल्य भारत ही रेल्वेची खास पर्यटन गाडी या स्थानकावरून दक्षिण भारताकडे परवा गेली. या गाडीत देशातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ बघणारे पर्यटक होते. ही खास गाडी या स्थानकावर सुमारे पाऊण तास थांबली होती. या वेळात या गाडीतील पर्यटकांनी भिंतीवर रेखाटलेली चित्र बघितले. पुतळ्यांसोबत फोटो काढलेत. ‘लोकमत’ने यातील काही प्रवाशांना विचारले असता, बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील चित्र आणि पुतळ्यांबाबत ऐकले होते. ते आम्हाला प्रत्यक्ष बघता आले. हे सारे बघून ताडोबा आणि या भागातील वनसंपदा कशी संपन्न आहे याची कल्पना आली. हे सारे आम्ही कॅमेऱ्यात बंद केल्याने ते आमच्या संग्रही राहणार आहेत, असे ते हे चित्र आणि पुतळे यावर प्रतिक्रिया देत म्हणाले. राज्याचे वन, अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेने बल्लारपूर रेल्वे स्थानक वेधक चित्र आणि पुतळ्यांनी सजल्याने या रेल्वे स्थानकाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, हे महत्त्व कायम ठेवण्याकरिता या चित्रांची आणि पुतळ्यांची देखरेख आणि निगा राखणे, दक्षता घेणे गरजेचे आहे. त्याचे कारण लोकांचे वागणे ! लोकांनी पुतळे जवळून बघावेत, त्यांची छायाचित्रे काढावीत हे मान्य ! पण, काही जण पुतळ्यावर बसून, त्याला हात लावून फोटो काढतात. पुतळ्यांना हलवून बघतात. हरणाचे कळप, बगडे यांचे पुतळे नाजुक आहेत. लोकांनी पुतळ्यांना हात लावू नये, हलवून बघू नये, वाघ आणि रेड्या या पुतळ्यावर बसू नये, असे सूचनाफलक पुतळ्यांजवळ लावायला हवेत. तसे अजून लावलेले नाहीत. रेल्वे सुरक्षा यंत्रणेने या पुतळ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या कला सौंदर्याने, सुशोभिकरणाने बल्लारपूर रेल्वे स्थानकाला देशात मानाचे स्थान मिळाले आहे. त्या मानाची, नावाची जपणूक येथील चित्र आणि पुतळे यांची क्षति होऊ नये याची दक्षता प्रवाशी आणि बल्लारपूरवासीयांनी घेण्याची गरज आहे.