शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

वनमाफिया सरपंचाला अटक करा

By admin | Updated: April 18, 2015 01:08 IST

पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा (माल) येथील वनजमिनीवर खोटा वनहक्क दावा सादर करून त्यावरील सागवान वृक्षाची कत्तल करणाऱ्या वनमाफिया सरपंचाला तातडीने अटक करा,...

चंद्रपूर: पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा (माल) येथील वनजमिनीवर खोटा वनहक्क दावा सादर करून त्यावरील सागवान वृक्षाची कत्तल करणाऱ्या वनमाफिया सरपंचाला तातडीने अटक करा, या मागणीसाठी वेळवा येथील ग्रामस्थांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा तिसरा दिवस असला तरी अद्याप या उपोषणाची दखल घेण्यात आली नाही.अजय सारंग लोणारे असे सरपंचाचे नाव असून तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्याने वेळवा (माल) येथील सर्वे नं.५७ वरील १० ते १२ एकर जमिनीवर खोटा वनहक्क दावा सादर करून ती जमिन बळकावण्याचा प्रयत्न केला, असा उपोषणकर्त्या ग्रामस्थांचा आरोप आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या जमिनीवरील एक हजार ८५१ झाडांची बेकायदेशिर कत्तल केली. अजय लोणारे यांनी पोंभुर्णाचे तहसीलदार, कोठारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनक्षेत्र सहाय्यक गोंगले यांना हाताशी धरून कागदपत्रांची जुळवाजुळव केली. त्या आधारे वनहक्क दावा सादर केला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांनी याविरोधात २०१४ पासून सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदने देऊन हा प्रकार उजेडात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वन विभागाने या निवेदनांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे १५ एप्रिलपासून गावकऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात विलास भंडारे, कवडू सुरपाम, सारंग कुळमेथे, रणधिर जाधव, सुकरू कायरकर, दिवाकर राऊत, गंगाधर जाधव सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य होईस्तोवर उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)