शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते संतोष रावत यांच्यावरील हल्लेखोरांना अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू - आमदार सुभाष धोटे

By राजेश भोजेकर | Updated: May 12, 2023 11:02 IST

संतोष रावत यांच्यावरील हा जीवघेणा हल्ला लक्षात घेता पोलीस प्रशासनाने ताबडतोब त्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा मुल येथील झुंजार काँग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर काल काही अज्ञात इसमांनी गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते या भ्याड हल्ल्यातून बचावले, किरकोळ जखमी झाले आहेत. चंद्रपूर जिल्हय़ाच्या सौहार्दपूर्ण सांस्कृतिक वैभववाला छेद देणारी ही घटना असून या भ्याड हल्ल्याचा मी अतिशय तीव्र निषेध करतो असं आमदार सुभाष धोटे म्हणाले.

आमदार धोटे यांनी सांगितले की, सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना अनेकदा आपआपसात मतभेद होत असतात, कलह निर्माण होतात परंतु कारण कुठलेही असो, राजकीय वैमनस्य असो की अन्य कुठलेही कारण असो, गुन्हेगार नेमके कोण आहेत. या हल्ल्यामागील नेमके कारण काय आहे. यासर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी. तसेच संतोष रावत यांच्यावरील हा जीवघेणा हल्ला लक्षात घेता पोलीस प्रशासनाने ताबडतोब त्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे. या भ्याड हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अन्यथा प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार सुभाष धोटे यांनी दिला आहे.