शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चंद्रपूर जिल्हा बँक अध्यक्ष रावतांवरील हल्लेखोरांना अटक करून अहवाल सादर करा

By राजेश भोजेकर | Updated: May 19, 2023 16:26 IST

Chandrapur News चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह यांना दिले आहेत.

राजेश भोजेकर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर ११ मे रोजी रात्री ९:१९ वाजता मूल शहरात अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीतून गाेळी झाडून गंभीर स्वरुपाचा हल्ला केला. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अद्यापही अपयश आले नाही. याप्रकरणाला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही गांभिर्याने घेतले आहे. पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांना हल्लेखोरांना तात्काळ अटक करून तसा अहवाल पाठविण्याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले आहेत. यामुळे आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

 मुनगंटीवार यांनी पोलिस अधीक्षक परदेशी यांना दिलेल्या आदेशात आरोपींना अटक करण्यात यावी, याबाबत दूरध्वनीवरून वारंवार सूचना करण्यात आल्याचे नमुद केले आहे. मात्र याप्रकरणात अद्यापही आरोपींपर्यंत पोलिस पोहचले नाही. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच याबाबतचा अहवाल आपणाला सादर करावा, असे स्पष्ट निर्देशच ना. मुनगंटीवार यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

११ मे रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत हे सायंकाळी मूल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गेले होते. तेथून आपल्या दुचाकीने बाहेर पडल्यानंतर काहीच अंतरावर हल्लेखार कारने तेथे आधीच येऊन होते. संतोषसिंह रावत हे तेथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाजवळून जात असताना अचानक चेहऱ्यावर नकाब असलेला हल्लेखोर कारमधून बाहेर आला. त्याने काहीही कळायच्या आत संतोषसिंह रावत यांच्या दिशेने बंदुक रोखून गोळी झाडली. हल्ला होत असल्याचे लक्षात येताच रावत हे दुचाकीवरच वाकल्याने बंदुकीची गोळी त्यांच्या डाव्या हाताच्या भुजाला चाटून गेल्याने या गंभीर स्वरुपाच्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत. मात्र त्यांना अद्यापही हल्लेखोर सापडले नाही. याप्रकरणी हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. इतकेच नव्हे तर तसा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिलेले आहेत.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार