शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्या दौऱ्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 16:54 IST

भा.रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड या गावी येत आहेत. या कार्यक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. दिल्लीच्या एसपीजी कार्यालयातील अधिकारी या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.

ठळक मुद्देनांदेड येथे सकाळी १०.३० वाजता आगमन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर - एचएमटीचे तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी भा.रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड या गावी येत आहेत. या कार्यक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. दिल्लीच्या एसपीजी कार्यालयातील अधिकारी या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.राहुल गांधी दिल्लीवरून नागपूरला आल्यानंतर ते हेलीकॉप्टरने नांदेड येथे येणार आहेत. त्यासाठी हेलीपॅडची निर्मिती करण्यात येत आहे. ज्या जागेवर हेलीपॅड तयार करण्यात आले ती जागा यासाठी योग्य आहे की नाही याची ट्रायल आज हेलीकॉप्टर उतवून घेण्यात आली. दादाजींच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर राहुल गांधी शेतकºयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी स्टेज तयार करण्यात येत आहे. मैदानही साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार अविनाश वारजूकर यांच्या देखरेखीखाली ही सर्व कामे सुरू आहेत .राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कुठलीही कसर बाकी राहू नये यासाठी जवळपास ५०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. पोलिसदलाची संख्या लक्षात घेता नांदेडला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्यासारखे दिसत आहे. जि.पो.अ. नियती ठाकर लक्ष ठेवून आहेत.लोकांत उत्सुकतादादाजी खोब्रागडे यांचे नाव फोर्ब्स मध्ये आल्यानंतर मोठमोठया नेत्यांनी नांदेडला भेटी दिल्या. मात्र यावेळी दादाजींच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राहुल गांधीसारखे राष्ट्रीय नेते नांदेड या छोट्या गावात येत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. केवळ नांदेडमध्येच नाही तर संपूर्ण नागभीड तालुक्यात ही उत्सुकता दिसून येत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी