शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:06 IST

भावी पिढीचे आरोग्य निरोगी व निरामय राहावे, जलजन्य आजारांपासून विद्यार्थ्यांना मुक्ती मिळावी, आजारपणामुळे शालेय अभ्यासक्रमात खंड पडू नये व ज्ञानार्जन सुलभपणे करण्यासाठी अनुदानित शाळांना वॉटर फिल्टर मंजूर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : अनुदानित शाळांना वॉटर फिल्टर मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : भावी पिढीचे आरोग्य निरोगी व निरामय राहावे, जलजन्य आजारांपासून विद्यार्थ्यांना मुक्ती मिळावी, आजारपणामुळे शालेय अभ्यासक्रमात खंड पडू नये व ज्ञानार्जन सुलभपणे करण्यासाठी अनुदानित शाळांना वॉटर फिल्टर मंजूर करण्यात येणार आहे. या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्याची घोषणा राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.येथील साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंटमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून नामदार मुनगंटीवार यांनी घोषणा करून अनुदानित शाळा संस्था चालकांना मोठा दिलासा दिला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर, संवर्ग विकास अधिकारी श्वेता यादव, उपसभापती इंदिरा पिपरे, जि. प. सदस्य हरिश गेडाम, वैशाली बुद्धलवार, पंचायत समिती सदस्य विद्या गेडाम, सोमेश्वर पद्मगिरीवार आदींची उपस्थिती होती.दरम्यान चिंतामणी माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रशांत दोंतुलवार व स्व. गोपाळराव वानखेडे माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करून देण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन सादर करून आग्रही मागणी केली होती. प्राचार्य प्रशांत दोंतुलवार व प्राचार्य नरेंद्र बोबडे यांच्या मागणीला ना. मुनगंटीवार यांनी तात्काळ मंजूर करून वॉटर फिल्टर यंत्रणा कार्यान्वित करण्याची घोषणा केली.यामुळे प्राचार्य अनिता पंधरे, प्राचार्य संध्या बोबडे, प्राचार्य शैलेश झाडे, मुख्याध्यापक संजय चौधरी, मनोहर माडेकर, कोपुलवार यांच्या शाळेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.