शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी आगाराच्या वाहतूक नियंत्रकाचा मनमानी कारभार

By admin | Updated: June 11, 2016 00:57 IST

ब्रह्मपुरी एसटी आगारातील वाहतूक नियंत्रकाच्या मनमानी कारभाराने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

प्रवाशांना दमदाटी : अनियमित बसफेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्तमेंडकी : ब्रह्मपुरी एसटी आगारातील वाहतूक नियंत्रकाच्या मनमानी कारभाराने प्रवासी त्रस्त झाले आहेत. बसची चौकशी करण्यासाठी फोन केल्यास योग्य उत्तर मिळत नाही, अशी तक्रार प्रवाशांनी केली आहे. १ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर एसटीचा ६८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध एसटी आगारातील चालक वाहकापासून तर सफाई कामगार वर्धापन दिनाच्या उत्सवात सहभागी झाले होते. काही आगारामध्ये एसटीच्या प्रवाशांना थंड पेय, पाणी, मिठाई, फळे वाटण्यात आले तर काही ठिकाणी प्रवाशांचा सत्कार करण्यात आला.मात्र ब्रह्मपुरी आगारातील वाहतूक नियंत्रक कार्यालयातील कर्मचारी प्रवाशांवर दूरध्वनीवर शिविगाळ केल्याचा प्रकार वर्धापन दिनी घडला. मेंडकी येथील अनंत सातव मागील आठ वर्षापासून सिंदेवाही येथे नोकरीला आहेत. ते रोज मेंडकी ते सिंदेवाही एसटी बसने प्रवास करतात. ब्रह्मपुरी ते वाढोणा सिंदेवाही ही बस मेंडकी बसस्थानकावर ८.४५ ला येण्याची वेळ आहे. मात्र १ जून रोजी ही बस ९.४५ ला आली. बसला उशिर झाल्याने अनंत सातव यांनी ९.३० च्या सुमारास ब्रह्मपुरी आगारातील चौकशी विभागात दूरध्वनी वरुण विचारणा केली असता, तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांनी शिविगाळ केली. संबंधीत कर्मचाऱ्यांचे नाव विचारले असता, त्याने खालच्या पातळीवर बोलले. हा सर्व प्रकार उपस्थित प्रवाश्यांनी ऐकून घेत तक्रार केली आहे. (वार्ताहर)अनंत सावत यांनी केलेली लेखी तक्रार मान्य आहे. या अगोदर सुद्धा वाहतूक नियंत्रकाच्या लेखी तक्रार आलेल्या असून वाहतूक नियंत्रकावर योग्य त्या कारवाईसाठी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी दस्तावेज पाठविलेले आहे. कार्यवाही नक्कीच केली जाईल.- जगदीश म्हशाखेत्रे, आगारप्रमुख, ब्रह्मपुरी.