शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा येथील एम.आय.डी.सी.ला मंजुरी

By admin | Updated: August 8, 2015 01:04 IST

जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एम.आय.डी.सी. स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

शासन अधिसूचना निर्गमित : सुधीर मुनगंटीवारांचे प्रयत्न फळाला आलेचंद्रपूर : जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एम.आय.डी.सी. स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतची अधिसूचना शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने प्रसिध्द केली आहे. वित्त आणि नियोजन, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. यामुळे या भागातील बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पोंभुर्णा या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त तालुक्यातील औद्योगिक विकासाच्यादृष्टीने या तालुक्यासाठी एम.आय.डी.सी. स्थापन करण्यासाठी ना. सुधीर मुनगंटीवर यांनी गेल्या पाच वषार्पासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात विधानसभेत विविध संसदीय आयुधांचा वापर करुन त्यांनी ही मागणी शासन दरबारी रेटली. त्यांच्या सततच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले. पोंभुर्णा औद्योगिक क्षेत्रासाठी कोसंबी रिठ, चकहत्तीबोडी व देवाडा खुर्द येथील १८४.६७ हे.आर. खासगी क्षेत्र अधिसूचित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शासनाला सादर केला. शासनाने त्यास मंजुरी देवून अधिसूचना प्रसिध्द केली आहे. या अधिसूचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विभाग अधिनियम १९६१ अन्वये भूसंपादनाची कार्यवाही करण्याच्या सूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिनांक ६ आॅगस्टच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना दिल्या आहेत. त्यामुळे पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एम.आय.डी.सी. स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एम.आय.डी.सी. स्थापन करण्याचे आश्वासन पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांना दिले होते. त्यांनी दिलेल्या या आश्वासनाची पुर्तता झाली असून या माध्यमातून पोंभुर्णा या आदिवासीबहुल नक्षलप्रभावीत तालुक्याचा औद्योगिक विकास साधला जाणार आहे. त्याचबरोबर या तालुक्यातील तरुणांना रोजगारसुध्दा उपलब्ध होणार आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी ना. मुनगंटीवार यांनी निर्माण केलेल्या विकास कामांच्या दीर्घ मालिकेत पोंभुर्णा एम.आय.डी.सी. हा ठळक टप्पा ठरणार आहे. (प्रतिनिधी)