शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

चार आश्रमशाळांची मान्यता कायमची रद्द

By admin | Updated: May 12, 2016 00:59 IST

चिमूरच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत येत असलेल्या चार अनुदानीत आश्रमशाळांची कायमस्वरूपी मान्यता आयुक्तांनी नाकारली आहे.

आयुक्तांचे आदेश : शिक्षण क्षेत्रात खळबळचंद्रपूर : चिमूरच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत येत असलेल्या चार अनुदानीत आश्रमशाळांची कायमस्वरूपी मान्यता आयुक्तांनी नाकारली आहे. मान्यता रद्द करण्यात आलेल्या आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधांसह अनेक त्रुटी असल्याने त्यांची मान्यता कायमची नाकारण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मान्यता रद्द करण्यात आलेल्या आश्रम शाळांमध्ये अनुदानित आश्रमशाळा गोंदेडा, अनुदानित आश्रमशाळा गरडापार दोन्ही आश्रम शाळा चिमूर तालुक्यातील असून अनुदानित आश्रमशाळा कवडशी (बोर) व अनुदानित आश्रमशाळा सुर्ला या वरोरा तालुक्यातील दोन आश्रमशाळांचा समावेश आहे. या आश्रम शाळांची यापूर्वी विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत चौकशी झाली होती. यात चारही आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी, सुविधांचा अभाव व विविध समस्या आढळून आल्या. त्यामुळे नाशिक येथील आदिवासी विभागाचे आयुक्त यांच्यासमोर आश्रम शाळांची मान्यता नाकारण्याबाबत सुनावणी झाली. यात चारही आश्रम शाळांची मान्यता नाकारण्यात आली आहे. आयुक्तालयाने तसे आदेश काढले असून या आदेशान्वये चारही आश्रम शाळांची कायमस्वरूपी मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी संबंधित आश्रम शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश करू नये. सदर शाळेत विद्यार्थी प्रवेशित केल्यास व विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास सर्वस्वी जबाबदारी पालकांची राहील, असे चिमूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र एन. चौधरी यांनी कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)