शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाला मंजुरी द्यावी

By admin | Updated: November 6, 2016 01:00 IST

चंद्रपूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण झालेला वाहतूक प्रश्न यासाठी शहराला वळण मार्गाची गरज आहे.

आमदार शामकुळे : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्र्यांकडे मागणीचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण झालेला वाहतूक प्रश्न यासाठी शहराला वळण मार्गाची गरज आहे. मात्र ज्या भागातून वळण मार्ग प्रस्तावित होता. त्याच ठिकाणी आता लोकवस्ती झाली आहे. त्यामुळे पर्याय शोधावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर इरई नदी ते बंगाली कॅम्प यापर्यंत साडेसहा किलोमीटरचा उड्डाणपुलाला मंजुरी द्यावी, अशी मागणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमदार नाना श्यामकुळे यांनी केली आहे.शहराची वाढती लोकसंख्या तसेच औद्योगिककरण पाहता वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. १९८० मध्ये बायपाससाठी हॉटेल ट्रायस्टारच्या मागील भागातून तुकूम-शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाकडून जागा निश्चित करण्यात आली होती. या भागात आता जवळपास सातशे घरांची वस्ती आहे. इतकी मोठी वस्ती उठवून शहराच्या मध्यभागातून बायपास काढणे शक्य नसल्याने या बायपाससाठी स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध झाला. या भागातील वस्ती उठवून बायपास काढणे हे अन्यायकारक ठरणार असल्याने या बायपाससाठी मंजुरी देण्यात येऊ नये म्हणून काँग्रेसचे नगरसेवक अशोक नागपुरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या याचिकेच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने नुकतेच एक शपथपत्र दाखल केले असून त्या बायपाससाठी नवीन जागेचा शोध सुरू असल्याचे म्हटले आहे. मोरवा गावाच्या आतील भागातून लोहाऱ्यापर्यंत बायपास काढण्यात यावा, अशी सूचना होती. हे अंतर जवळपास ३५ किलोमीटरचे आहे. बायपाससाठी असलेल्या निकषामध्ये हे अंतर बसत नाही. त्यामुळे इरई नदी ते बंगाली कॅम्पपर्यंत उड्डाणपुलाची निर्मिती करणे हा एकमेव पर्याय आहे.यासंदर्भात अनेक दिवसांपासून आमदार शामकुळे यांचा पाठपुरावा सुरू आहे. शामकुळे यांनी पुन्हा नितीन गडकरी यांची भेट घेऊन उड्डाणपुलाची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी) अलिकडच्या पाच वर्षात चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्यावे वाढली आहे. येत्या काही वर्षात ती आणखी प्रचंड वाढेल. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न मिटविण्यासाठी इरई नदी ते बंगाली कॅम्पपर्यंत उड्डाणपुल गरजेचा आहे.