शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

‘अमृत’च्या विकास आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 01:00 IST

अमृत योजनेच्या सुमारे ३०५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे.

३०५ कोटींचा निधी: चंद्रपुरातील पाणी पुरवठा प्रबळ करणारचंद्रपूर : अमृत योजनेच्या सुमारे ३०५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या योजनेतून इरई नदीच्या जॉकवेलपासून तर ग्राहकांच्या नळाच्या तोटीपर्यंत दुरुस्ती करुन २०२१ पर्यंत शहरातील प्रत्येक नागरिकाला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करता येणार आहे. मानगरपालिकेने दिवाळीनिमित्त चंद्रपुरकरांना दिलेली ही सर्वात मोठी भेट असून भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही, असा विश्वास महापौर राखी कंचर्लावार आणि आयुक्त संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.अमृत योजनेसाठी केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार २५ टक्के आणि महानगरपालिका २५ टक्के खर्चाचा वाटा उचलणार आहे. अमृत योजनेचे काम दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २३४ कोटी रुपये खर्च करुन शहरात सुमारे ५५३ किलोमीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे. इरई नदी ते चंद्रपूर शहरापर्यतची १७ किलोमीटरची मोठी पाईपलाईनसुद्धा बदलण्यात येणार आहे. १६ पैकी ८ पाण्याच्या टाक्या पाडून ८ नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहे. तसेच तुकूमधील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती आणि दाताळा इरई नदीवरील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे काम २४ महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.दुसऱ्या टप्प्यात ७१ कोटी रुपये खर्च करुन धानोरा बॅरेजवरुन चंद्रपूर शहरापर्यंत नवीन पाईपलाईन टाकली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सन २०४८ पर्यंतची संभाव्य ५.२६ लाख शहराची लोकसंख्या गृहित धरुन ही पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. शहराच्या प्रत्येक भागात समप्रमाणात पाणी वाटप केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रपूर शहराची पहिली पाणीपुरवठा योजना सन १९७६ मध्ये सुरू करण्यात आली. त्यावेळी शहर आणि शहराची लोकसंख्या लहान होती. त्यामुळे १९८५ पासून इरई धरणातून पाण्याची उचल सुरु आहे. त्यावेळी २.१० लाख लोकसंख्येसाठी पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली. सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या सुमारे ३.५० लाख आहे. सध्याच्या लोकसंख्येनुसार ५१ एमएलडी पाणी अपेक्षित आहे. मात्र, ४० एमएलडी पाणीच मिळते. त्यापैकी ठिकठिकाणी असलेल्या लिकेजेसमुळे ८ एमएलडी पाण्याची गळती होते.नव्या योजनेमध्ये गळती होणार नसल्याने आठ एमएलही पाणी वाया जाणार नाही. धानोरा बॅरेजमध्ये २६ एमएम क्यूब पाणी शहरासाठी राखीव आहे. दुसऱ्या टप्प्यातील योजना पूर्णत्वास आल्यानंतर धानोरा बॅरेजवरुन आणखी ४० एमएलडी पाण्याची उचल केली जाणार आहे. सध्या शहरातील नळ ग्राहकांची संख्या २७ हजार असून सर्वेक्षणातत निदर्शनास आलेल्या मालमत्तेनुसार भविष्यात जवळपास ७० हजार नळाचे ग्राहक होतील, अशी अपेक्षा आहे. हे सर्व गृहित धारुनच अमृत योजना तयार करण्यात आल्याचे आयुक्त काकडे यांनी सांगितले.दुसरी महत्वाची बाब म्हणजे या योजनेचे काम सुरु करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी रस्ते फूटणार आहेत. या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यासाठी योजनेमध्ये निधीचा समावेश करण्यात आल्याचेही काकडे यांनी सांगितले.सध्याची पाणीपुरवठा योजना अत्यंत तोकडी आहे. प्रत्येक भागात पाईपलाईन नसल्याने पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे पाणीपुरवठासंबंधी नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मात्र, ही योजना अंमलात आल्यानंतर पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटेल. त्यामुळे चंद्रपूरकरांसाठी महानगरपालिका प्रशासनाने दिलेली ही मोठी भेट असल्याचे काकडे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला उपमहापौर वसंत देशमुख, उपायुक्त डॉ. विजय इंगोले, शहर अभियंता महेश बारई, नगरसेवक संदीप आवारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)