शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा नगरपालिकेच्या ९० हजारांच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी

By admin | Updated: February 27, 2016 01:23 IST

राजुरा नगरपालिकेचे ९० हजार रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक गुरुवारी झालेल्या नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले.

राजुरा : राजुरा नगरपालिकेचे ९० हजार रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक गुरुवारी झालेल्या नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले. नगराध्यक्षा मंगला आत्राम यांनी ९० हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. सदर अंदाजपत्रकात २०१६-१७ वर्षात महसूल व भांडवली उत्पन्न ३६ कोटी ३६ लाख ७२ हजार अपेक्षित असून खर्च ३६ कोटी ३६ लाख ३२ हजार अपेक्षित आहे. मागील शिलकीसह अंदाजपत्रक शिल्लक ९० हजार आहे. आजच्या बजेटचे वैशिष्ट्य असे की, स्पर्धा परीक्षाकरिता अभ्यासिका तयार करणे, वाचनालय सुसज्ज करणे. शहर स्वच्छ व सुंदर आणि १०० टक्के हागणदारीमुक्त करणे, युवकाकरिता चार व्यायामशाळा बांधकाम करणे, चार प्रभागात बगिचे तयार करणे, तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम पूर्णत्वास नेणे, या व्यतिरिक्त रस्ते, नाल्या व इतर आवश्यक कामाचा समावेश करण्यात आलेला आहे. सभेला उपनगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी सुनील बल्लाळ उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)