शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आबोजवार, वाढई, यादव सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 01:12 IST

मनपा व महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर आता विविध विभागातील पदाधिकाऱ्यांची निवडणूक होत आहे.

झोन सभापती निवडणूक : भाजपाचे दोन तर बसपाचा एक लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मनपा व महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर आता विविध विभागातील पदाधिकाऱ्यांची निवडणूक होत आहे. गुरुवारी झोन सभापतींची निवडणूक पार पडली. यात भाजपाच्या आशा आबोजवार व देवानंद वाढई आणि बसपाच्या रंजना यादव हे विजयी झाले आहेत. मनपाचा कारभार गतिमान व सुरळीत चालावा, नागरिकांनाही वारंवार मनपा कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये म्हणून मनपाकडून शहरात तीन झोन कार्यालयाची निर्मिती केली आहे. येथील झोन सभापतींची निवडणूक प्रक्रिया मनपाच्या सभागृहात गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलिल उपस्थित होते. प्रारंभी झोन क्रमांक १ साठी निवडणूक घेण्यात आली. या झोन सभापती पदासाठी भाजपाच्या वनिता डुकरे व बसपाच्या रंजना यादव यांनी आपले नामांकन दाखल केले. त्यामुळे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. २३ सदस्य संख्या असलेल्या या झोनमधून वनिता डुकरे यांना ११ तर रंजना यादव यांना १२ मते मिळाली. बसपाच्या रंजना यादव यांनी सभापती म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर झोन क्रमांक २ साठी नामांकन मागविण्यात आले; मात्र येथे भाजपाचे देवानंद वाढई यांचे एकमेव नामांकन असल्याने त्यांना झोन क्रमांक २ चे सभापती घोषित करण्यात आले. झोन क्रमांक ३ मध्येही भाजपाच्या आशा आबोजवार यांचे एकमेव नामांकन असल्याने त्यांनाही अविरोधी विजयी घोषित करण्यात आले. काँग्रेसचा बसपाला पाठिंबा महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे विजय संपादन करता आला नाही. दरम्यान, आज गुरुवारी झालेल्या झोन सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला नाही. उलट बसपाच्या उमेदवारांना काँग्रेसने पाठिंबा दिला. यामुळे झोन क्रमांक ३ मधून बसपाच्या रंजना यादव यांचा विजय झाला.