शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: April 9, 2017 00:41 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगात काम करणारे संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे ....

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगात काम करणारे संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे या प्रश्नांवर लक्ष वेधण्याकरिता चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले आहे.जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. या ठिकाणी कुठलाही सक्षम अधिकारी नसल्याने संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.महाराष्ट्र राज्याने असंघटीत कामगाराकरिता इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सन २०११ ला सुरु केलेले आहे. परंतु या अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या विभागात सक्षम अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील अनेक कामगार या कार्यालयात दूरवरुन येऊन दिवसभर ताटकळत राहतात. सध्या शासनातर्फे असंघटीत क्षेत्रातील कामगारांकरिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, सुरक्षा रक्षक मंडळ, घरेलू कामगार मंडळ व बाल कामगार मंडळ, माथाडी कामगार मंडळ, यामध्ये येणाऱ्या नोंदीत लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील उद्योगामधील कामगाराच्या प्रश्नासंबंधी अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. अनेक दिवसापासून या विभागात सहायक कामगार आयुक्त व सरकारी कामगार अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे नियमित भरण्यात यावी, अनेक उद्योगामधील कामगारांना सुरक्षा सामुग्री पुरविण्यात येत नाही. तसेच या दृष्टीकोणातून कामगार विभागाच्या माध्यमातून नियमित निरीक्षण करणे गरजेचे असतानासुद्धा याकडे कामगार विभागात नियमित अधिकारी नसल्याने दुर्लक्ष होऊन अपघात घडण्याची शक्यात नाकारता येत नाही.