चंद्रपूर : नाभिक समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.नाभिक समाजाच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्या मागण्या निकाली निघाव्या म्हणून महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. केंद्र शासनाने १९८४ रोजीचे महाराष्ट्र शासनाला आदेश असताना महाराष्ट्र शासनाने सदर आदेश लागू केला नाही. १९७६ पासून नाभिक समाज तो आदेश लागू व्हावा म्हणून मोर्चे, धरणे, उपोषण करीत आहे. तरी या समाजाकडे लक्ष पुरविल्या जात नाही. आता तरी त्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष पुंडलिकराव केळझरकर, कार्याध्यक्ष दिनकर गोरे, सरचिटणीस अरुण जमदाडे, कोकण विभागीय अध्यक्ष जनार्दन गोरे, अॅड. ताठे, प्रमोद जाधव, बळीराम भोईर, नंदकिशोर कार्ले, अभिजीत केळझरकर आदी उपस्थित होते. या मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे महामंडळाने दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
नाभिक समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By admin | Updated: October 14, 2015 01:21 IST