शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जादुटोणाविरोधी कायद्यामुळे नरबळीला आळा बसेल

By admin | Updated: November 26, 2014 23:04 IST

जादुटोणाविरोधी कायदा हा खऱ्या अर्थाने क्रांतिकारी कायदा आहे. याची प्रभावीरित्या अंमलबजावणी झाल्यास नरबळीसाररख्या अमानुष प्रकारांना आळा बसेल, असे मत कार्यक्रम अंमलबजावणी,

चंद्रपूर : जादुटोणाविरोधी कायदा हा खऱ्या अर्थाने क्रांतिकारी कायदा आहे. याची प्रभावीरित्या अंमलबजावणी झाल्यास नरबळीसाररख्या अमानुष प्रकारांना आळा बसेल, असे मत कार्यक्रम अंमलबजावणी, प्रसार आणि प्रचार समितीचे सहअध्यक्ष तथा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग समाजकल्याण आयुक्तालय पुणे यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण चंद्रपूर यांच्याद्वारा स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण विभाग नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त आर.डी. आत्राम, पीआयएमसी सदस्य सुरेश झुरमुरे, अभाअंनिसचे महाराष्ट्र राज्य संंघटक दिलीप सोळंके, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, जिल्हा परषिदेचे समाजकल्याण अधिकारी विजय वाकूलकर यांची उपस्थिती होती.प्रा. श्याम मानव म्हणाले, या जगात कोणीही चमत्कार करु शकत नाही. चमत्काराचे समर्थन करणारे आणि विश्वास ठेवणारे बाबांच्या बुवाबाजीला बळी पडतात. या जगात जादुटोणा, मंत्रतंत्रांचे अस्तित्व नसतानाही जादुटोणाच्या संशयापोटी अनेक घटना घडत आहेत. त्याआधी जादुटोणाविरोधी कायद्याचा प्रचार आणि प्रसार करणे काळाची गरज असून सर्व सुज्ञ जनतेने या क्रांतिकारी कायद्याचे वाहक बनावे, असे आवाहन याप्रसंगी प्रा. मानव यांनी केले. सदर कार्यक्रमात तथाकथीत बुवा-बाबांचे चमत्कार करुन दाखवून त्यामागील वैज्ञानिक कारणेही सांगण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले की, अंधश्रद्धेचे निर्मूलन होणे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे गरजेचे आहे. या कायद्याचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. प्रादेशिक उपायुक्त, आर.डी. आत्राम यांनीही कायद्याचा प्रचार-प्रसाराच्या कार्यक्रमांना लाभत असलेल्या जनतेच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रास्ताविक दिलीप सोळंके , संचालन हरिभाऊ पाथोडे यांनी तर आभार सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमासाठी अनिल दहागावकर, गजानन मरस्कोले, धनंजय तावाडे, अभय गौर, सुलेमान बेग आदी उपस्थित होत. (नगर प्रतिनिधी)