शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 11:28 IST

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ज्योतिषशास्त्र शिकविण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ज्योतिषशास्त्र शिकविण्यात येणार आहे. यावर्षीपासून हे विद्यापीठ पदव्युत्तर पदवी आणि पदविका देणार आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या चार दशकांपासून ‘फलज्योतिष थोतांड आहे’ हे लोकांना समजावून सांगत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला आहे.

२००१ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केला होता. तेव्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीन महिने फलज्योतिष विरोधी अभियान राबविले होते. त्यानंतर हा अभ्यासक्रम रद्द केला. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राबविलेल्या अभियानात ज्योतिष्यांना सुद्धा त्यांची बाजू मांडण्यासाठी पाचारण केले होते; परंतु कोणीही फलज्योतिष हे शास्त्र आहे, असं सांगू शकले नाही. याउलट जगभरातील १८६ वैज्ञानिकांनी, ज्यात १९ नोबेल पारितोषिक विजेते आहेत, त्यांनी ‘फलज्योतिष’हे शास्त्र नाही. केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्वास ठेऊ नये, असे पत्रक काढले. आता इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करून लोकांना दैववादी बनविण्याचे षडयंत्र करीत आहे. हे षडयंत्र उलथविण्याचा प्रयत्न करून लोकांचे प्रबोधन करण्यात येईल, असे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र