शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

एकाच्या नियुक्तीमुळे दुसरा अतिरिक्त

By admin | Updated: August 27, 2015 01:23 IST

शाळेत रिक्त पद उपलब्ध नसताना संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी अंतर्गत बदल्या करून शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली.

अंतर्गत बदलीचा फटका : पद रिक्त नसतानाही शिक्षकाची नियुक्तीचंद्रपूर : शाळेत रिक्त पद उपलब्ध नसताना संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी अंतर्गत बदल्या करून शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली. त्यानंतर कार्यरत सेवाज्येष्ठता शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांची दुसरीकडे बदली केली. हा प्रकार सावलीसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यात घडला आहे. याचा फटका अनेक शिक्षकांना बसला असल्याने ही प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस जे.डी. पोटे यांनी केली आहे.१८ एप्रिल २०१३ च्या शासन निर्णयानुसार सावली येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी रिक्त पद नसताना पंचायत समिती सभापतींच्या शिफारशीनुसार फेब्रुुवारी २०१४ मध्ये काही शिक्षकांच्या बदल्या केल्या. त्यामुळे अनेक शाळांतील कार्यरत शिक्षकांना २०१४ मध्ये अतिरिक्त ठरवून त्यांची दुसरीकडे नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे शिक्षकांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार शिक्षकांवर अन्याय करणारा असल्याचे पोटे यांचे म्हणणे आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त करता येणार नसल्याचा निर्णय दिला आहे. मात्र, संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी बदली करून अनेक कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त ठरविले आहे. हा प्रकार चुकीचा असल्याने ही प्रक्रिया रद्द करावी, यासाठी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना लवकरच निवेदन सादर करणार असल्याचेही पोटे यांनी सांगीतले. (प्रतिनिधी)