शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

आणखी १२ तस्कर जाळ्यात

By admin | Updated: April 9, 2015 01:14 IST

वाघाचे अवयव तस्करी प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून यातील आरोपींची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.

मूल : वाघाचे अवयव तस्करी प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून यातील आरोपींची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. तपासाची चक्रे चिचपल्ली वनपरिक्षेत्र व मूल येथील बफर झोन कार्यालयाच्या वनाधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या चालविल्यानंतर या प्रकरणातील आणखी १२ आरोपींना अटक करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची संख्या १५ वर पोहोचली आहे.मुख्य आरोपी दिलीप श्रीहरी मडावीया या इसमाला मूल येथील बसस्थानक परिसरात वाघाच्या अवयवाची तस्करी करताना वनविभागाच्या पथकाने पकडले. त्यानंतर दोन आरोपींना पकडण्यात आले. न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत वनकोठडी सुनावल्यानंतर तपासाची चक्रे चिचपल्ली वनपरिक्षेत्र व मूल येथील बफर झोन कार्यालयाच्या वनाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या चालविली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भादुर्णी येथील कक्ष क्र. ४८५ मध्ये घडलेल्या शिकार चक्रात आतापर्यंत १५ आरोपींना पकडण्यात आले आहे. यातील तिघांना न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे बुधवारी अटक करण्यात आलेल्यांगमध्ये मुकुंदा तोडासे रा. भांदुर्णी, राजू जिदगिलवार रा. मारोडा, दिलीप गोटेफोडे रा. मूल, किशोर गणविर रा. मूल, मिथुन हलदर रा. चंद्रपूर तर गडचिरोली येथील आदित्य अशोक बिसेन, गुड्डू प्रभाकर मोहुर्ले, संजय नरसय्या गणवेनवार, सूरज उमाजी तावाडे, आदीक सादीक शेख, मंगेश वासुदेव लोणारकर, प्रशांत लहुदास तुमराम यांचा समावेश आहे. चंद्रपूर येथील एका आरोपींच्या शोधात वनविभागाचे पथक फिरत असून त्याचा थांगपत्ता लागला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकरणात आरोपीची संख्या लक्षात घेता ग्रामीण भागातून चंद्रपूर- गडचिरोली सारख्या शहरात याचे तार पोहचले असल्याचे दिसून येते. आरोपींना पकडण्यासाठी सहायक वनसंरक्षक विवेक मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी पठाण, क्षेत्रसहाय्यक जांभुळे, गलगट, वनपरिक्षेत्र अधिकारी ओ. बी. पेंदोर, सहाय्यक वनसंरक्षक पवार, क्षेत्रसहाय्यक सोनवाने, नेवारे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)