परिषदेत ७८० डॉक्टरांचा सहभाग
चंद्रपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनची वार्षिक सिमेकॉन आभासी परिषद १५ जानेवारपासून सुरू झाली. या परिषदेत सहभागी होण्यासाठी ७८० सदस्यांनी नोंदणी केली आहे.
सिमेकॉन नावाची ही परिषद गेल्या सात वर्षांपासून कार्यरत आहे. परिषदेला यंदा आठ वर्षे झाले. महाराष्ट्र मेडिकल काैन्सिलने मान्यता दिलेल्या ७८० सदस्य परिषदेत सहभागी होणार आहे. परिषदेचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल माडूरवार, सचिव डॉ. सुरभी मेहरा, निरीक्षक डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या उपस्थितीत पार पडले होते. डॉ.कल्पना गुलवाडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात डॉ. अभिषेक दीक्षित ,सचिव डॉ.अनुप पालीवाल, डॉ. सुधीर रेगुंडवार, डॉ.पल्लवी इंगळे, डॉ.प्राजक्ता असवार, डॉ. अभय राठोड, डॉ. अमित देवईकर, डॉ.अजय दुद्दलवार आदींनी सहकार्य केले. परिषदेसाठी सर्व डॉक्टरांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने केले आहे.