शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या अच्छे दिनची घोषणा हवेतच विरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:30 IST

सरकार स्थापनेपूर्वी सर्वसामान्य नागरिकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने भांडवलदाराच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देगॅस, रॉकेलची दरवाढ मागे घ्या : काँग्रेसतर्फे पेट्रोलियम मंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सरकार स्थापनेपूर्वी सर्वसामान्य नागरिकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने भांडवलदाराच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे सुरू केले आहे. सत्ता स्थापनेच्या तीन वर्षांच्या निमित्ताने सरकारने थेट अनुदानित स्वयंपाक गॅसचे ७ रूपये व विनाअनुदानित गॅसमध्ये ७४ रूपये तसेच रॉकेलचे दर वाढवून भाजप सरकारने भांडवलदारांना दिलेली वचनपुर्ती पूर्ण केली आहे. मात्र यात सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. त्यामुळे कुठे गेले अच्छे दिन, असा प्रश्न करीत चंद्रपूर शहर काँग्रेसचे सचिव महेश मेंढे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन रॉकेलची दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे.यावेळी शिष्टमंडळाशी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी चर्चा करून मागण्यांचे निवेदन केंद्र शासन दरबारी पाठविण्याचे आश्वासन दिले. पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांना जिल्हाधिकाºयांमार्फत देण्यात आलेल्या निवेदनात केंद्र सरकारच्या दरवाढीवर आक्षेप घेण्यात आला आहे. केंद्र सरकारद्वारा अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर व रॉकेलच्या किंमतीमध्ये मोठी दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आतापर्यंत आठव्यांदा करण्यात आली आहे. वारंवार होणारी दरवाढ सामान्य गोरगरीब जनतेला परवडणारी नाही. भाववाढ केल्यामुळे गरीब जनतेला मिळणारी सबसिडी बंद होण्याच्या मार्गावर आहे. तसेच या भाववाढीमुळे केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.त्यामुळे स्वयंपाकाची गॅस व रॉकेलचे दर कमी करून भाजपने निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेला दिलेले आश्वासन पाळावे व वाढविले दर तत्काळ मागे घ्यावे, असे निवेदन चंद्रपूर विधानसभा काँग्रेस क्षेत्रातर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांना पाठविण्यात आले आहे.शिष्टमंडळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, चंद्रपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव, रोशन रामटेके, कार्याध्यक्ष नागेश बोंडे, अरविंद मडावी, सी. रेमण्डस, जीवन दुधकोहर आदींचा समावेश होता. दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारनेही कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांना रांगेत उभे केले आहे. त्यामुळे भाजप सरकार भांडवलदारांचे की शेतकºयांचे असा प्रश्न काँग्रेस पदाधिकाºयांनी केला आहे.