शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

माणिकगड पहाडावरील जनावरांना उपचार मिळेना

By admin | Updated: November 15, 2014 01:32 IST

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी जिवती येथे श्रेणी-२ पशुवैद्यकीय दवाखान्याची स्थापना करण्यात आली.

जिवती : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी जिवती येथे श्रेणी-२ पशुवैद्यकीय दवाखान्याची स्थापना करण्यात आली. मात्र गेल्या अनेक दिवसापासून येथील महिला पशुधन पर्यवेक्षीका हजर राहत नसल्याने उपचारासाठी जनावरे घेवून दवाखान्यात आलेल्या पशुपालकांना उपचाराविनाच परतावे लागत आहे. चकरा मारुन मारून अनेकांची जनावरे दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तालुक्याचे ठिकाणी असलेया दवाखान्यात जनावरांच्या विविध आजारावर योग्य निदान होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र निदान तर सोडाच येथे डॉक्टरच राहत नसल्याची बोंब आहे. गावाची संख्या व तेथील पशुधनाची संख्या पाहता तालुक्याच्या ठिकाणी श्रेणी एकचे चिकित्सालय आवश्यक असून मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे. श्रेणी दोनच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षीका महिला दिल्याने उलट त्रास वाढला. त्यांची आता बदली झाली असून अद्याप कोणताही डॉक्टर येथे रुजू झालेला नाही. दवाखान्या अंतर्गत येणारी गावे व त्यांच्यातील अंतर व रस्त्याची दयनीय अवस्था ही महिला पशुधन पर्यवेक्षीका उपचारासाठी पाऊले उचलली नसल्याचे कळते.परिसरात मोठ्या प्रमाणात जनावरे पाळली जातात. मात्र, जनावरांना विविध आजारांनी ग्रासले आहे. गावात उपचार मिळत नाही. मग जनावराला उपचारासाठी न्यायचे कुठे असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जनावरांना उपचार देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे याकडे लक्ष द्यावे. (तालुका प्रतिनिधी)