शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

प्राणी सेवाकेंद्र बंद पडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:31 IST

पिरली येथील 'पिपल्स फॉर अ‍ॅनिमल' संस्थेच्या प्राणी सुधार केंद्राला मिळणारी शासकीय मदत मागील पाच वर्षांपासून बंद करण्यात आली. त्यामुळे हे केंद्र आर्थिक संकटात सापडले आहे. केंद्रात सुमारे १०० जनावरे असून वैरणाचा खर्च कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला.

ठळक मुद्देपाच वर्षांपासून अनुदान बंद : चाऱ्याअभावी १०० जनावरांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी (भद्रावती) : पिरली येथील 'पिपल्स फॉर अ‍ॅनिमल' संस्थेच्या प्राणी सुधार केंद्राला मिळणारी शासकीय मदत मागील पाच वर्षांपासून बंद करण्यात आली. त्यामुळे हे केंद्र आर्थिक संकटात सापडले आहे. केंद्रात सुमारे १०० जनावरे असून वैरणाचा खर्च कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला.तत्कालीन केंद्रीय सामाजिक न्याय तथा पर्यावरणमंत्री मनेका गांधी यांच्या कल्पनेतून पिपल्स फॉर अ‍ॅनिमल संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने देशभरात अनेक शाखा तयार केल्या आहेत. पिरली येथे डॉ. महावीर सोईतकर यांच्या अध्यक्षतेखाली हे केंद्र सुरू करण्यात आली. सचिवपदावर भद्रावती येथील डॉ. दिलीप धोंगडे काम पाहतात. या संस्थेला श्रीहरी धोंगडे यांनी जमीन दान दिली. त्या जागेवर प्राणीसेवा केंद्र सुरू करण्यात आले. प्रारंभी भारतीय जीव जंतू कल्याण बोर्डाकडून संस्थेला अल्पशी आर्थिक मदत मिळत होती. त्यावर केंद्राचा कारभार सुरू होता. मात्र २०१३ नंतर केंद्र सरकारची आर्थिक मदत बंद झाल्याने संस्थेचे कार्य अडचणीत आले. दरम्यान, केंद्र चालविण्यासाठी डॉ. सोईतकर यांनी पदरमोड करून दर महिन्याचा खर्च करीत होते. डॉ. धोंगडे यांनीही स्वत:ची मालमत्ता विकून केंद्राला हातभार लावणे सुरू ठेवले. पण केंद्रात १०० जनावरे व कर्मचाºयांचा खर्च सांभाळण्यासाठी ते आर्थिकदृष्ट्या हतबल झाले. कसायाकडून जप्त केलेली व अपघातातून वाचलेली अपंग जनावरे तथा गरीब शेतकºयांनी आणलेल्या शंभराहून अधिक जनावरांच्या रोजच्या वैरणाचा खर्च परवडत नाही. शासन एकीकडे गोपालनासाठी प्रोत्साहन देत असल्याची घोषणा करते तर दुसरीकडे अनुदान बंद करणे सुरू केले. त्यामुळे शहरातील गो-पालक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.लोकप्रतिनिधींची उदासिनताकेंद्र व राज्य शासनाने गोहत्या बंदी, गोपालन आदी विषयांवरून देशभरातील वातावरण ढवळून काढत आहेत. काही कट्टर धर्मवादी व्यक्ती अथवा संघटनांनी अस्मिताकेंद्री राजकारण करून वातावरण तापवत आहेत. पण गो-पालनासाठी प्रामाणिकपणे कार्य संस्थांना अनुदान देणे बंद केले. यावरून शेतकºयांमध्येही प्रचंड नाराजी आहे. लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने पिरली येथील केंद्र्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. समाजातील दानदात्यांनी केंद्राला मदतीचा हात पुढे केल्यास गो-पालनाचे कार्य अविरत सुरू राहू शकेल.