शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पशु-पक्ष्यांनाही बसत आहे तापमानाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:53 IST

मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशु-पक्ष्यांनाही होत आहे. उष्माघाताचे अनेक पशुपक्षी बळी पडत आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देप्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे : भांड्यात पाणी, धान्य बाहेर ठेवून पक्ष्यांचा वाचवू शकता जीव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशु-पक्ष्यांनाही होत आहे. उष्माघाताचे अनेक पशुपक्षी बळी पडत आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघूम अवस्थामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून प्रत्येक जण गार पाणी, सरबतचा आधार घेत आहे. मात्र वाढत्या उष्माने त्रस्त पशू-पक्षांचे काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा वाढता पारा पाहता अंगाची लाहीलाही होत आहे. तापलेल्या उन्हामुळे माणसाप्रमाणे पशू-पक्ष्यांनाही त्रास होत आहे.उन्हाळ्यात माणसाला भूक कमी लागते, अपचन होते तसेच कधी कधी नाकातून रक्तस्त्राव होत असतो. अशावेळी काहींना हीट स्ट्रोकचाही फटका बसतो. माणसात दिसून येणारी ही लक्षणे प्राण्यांमध्येही दिसून येतात. तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशु-पक्षी सावलीत बसतात. मात्र, सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ पशू-पक्ष्यांना उष्मापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्माचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जावू शकतो. मांजर, कुत्रा, अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्माचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. त्यांना दम लागतो, तसेच हीटस्ट्रोक होतो. भोवळ येऊन ते पडतात, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर वनविभागात व वन्यप्रेमी मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे असून घराघरांत पशुपक्ष्यांसाठी पाण्याच्या घागर ठेवणे गरजेचे आहे.पशु-पक्ष्यांसाठी ‘वॉटरपॉर्इंट’पक्ष्यांना पाणी पिण्यास मिळावे म्हणून दोन झाडांच्या आधारे किंवा झाडावर बांबूच्या आधारे तीन भांडी अडकवून ‘वॉटरपॉर्इंट’ तयार करावे. यावत एका भांड्यात पाणी, एका भांड्यात धान्य आणि तिसºया भांड्यात गवत, कापूस ठेवून छोटासा बेड करावा. यात वॉटरपॉर्इंटवर पाणी पिण्यासाठी अनेक पक्षी येतात. ही व्यवस्था निवासी वसाहतीतही नागरिकांनी केल्यास पशु-पक्ष्यांचे जीव वाचविण्यास मदत करता येईल.हिरवळीचा अभावउन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी झाडांच्या सावलीचा आधार घेतात. मात्र, अलीकडे हिरवळ कमी झाल्याने प्राण्यांना सावलीसाठी आधार शोधावा लागत आहे, अशी खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करतात. ज्यांच्या घरी पाळीव जनावरे आहेत, अशांनी कडाक्याच्या उन्हाच्या वातावरणा दरम्यान प्राण्यांना, पक्ष्यांना योग्य असा आहार द्यावा.अशी घ्या काळजीघरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. पाळीव प्राणी बहुतांश वेळा चार भिंतीत असतात. घरातील तापमान आणि बाहेरील तापमानात फरक असतो. या प्राण्यांना सारखे घराबाहेर घेवून गेले की, ते अस्वस्थ होतात. ज्या घरात एसी आहे, अशा घरातील प्राण्यांना घराबाहेर लगेच नेल्यास त्यांनाही उष्म्याचा त्रास होतो. प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी घेवून जावे, पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये.

टॅग्स :Temperatureतापमान