शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाविरोधात संतप्त नागरिक धडकले वीज कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

लोक संतापाने पेटून उठले आणि तेव्हाच शंभराहून अधिक लोकांच्या जमावाने वीज कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना वीज पुरवठा पूर्ववत करण्यास भाग पाडले. त्याचे झाले असे, की शनिवारी रात्री १०.३० वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होता. मात्र, त्यानंतर तो अचानक खंडित झाला. लोकांनी एक तासभर विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहिली. पण, सुरळीत होण्याची लक्षणे दिसत नव्हती.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : शनिवारच्या रात्री १०.३० वाजता अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. एक तास होऊनही पूर्ववत होण्याची लक्षणे दिसेनात. लोक संतापाने पेटून उठले आणि तेव्हाच शंभराहून अधिक लोकांच्या जमावाने वीज कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना वीज पुरवठा पूर्ववत करण्यास भाग पाडले. त्याचे झाले असे, की शनिवारी रात्री १०.३० वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होता. मात्र, त्यानंतर तो अचानक खंडित झाला. लोकांनी एक तासभर विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहिली. पण, सुरळीत होण्याची लक्षणे दिसत नव्हती. सध्याच्या एप्रिल महिना सुरू असला तरी तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विजेशिवाय राहण्याची कोणी कल्पनाच करु शकत नाही.एक तासानंतरही वीज येण्याची लक्षणे दिसत नसल्याने लोकांचा संयम सुटला आणि सरळ वीज कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली. पाहता पाहता शंभराहून अधिक लोकांचा जमाव वीज कार्यालयासमोर जमला. वीज कार्यालयाचे दार उघडून वीज कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला आणि वीज सुरू करण्याची मागणी केली. मात्र, वीज कर्मचारी दाद देईनात. जमाव अधिकच आक्रमक होत होता. दरम्यान, पोलिसांचे आगमन  झाले आणि संतप्त होत असलेल्या जमावास शांत केले. यावेळी वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आणि सर्वांचाच जीव भांड्यात     पडला. ऐन उकाड्यात वीज पुरवठा खंडित हाेत असल्याने नागरिकांची महावितरणवर नाराजी आहे.

काही भागातील वीज सुरू नागभीडच्या अर्ध्या अधिक भागाचा भारनियमनाच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, नागभीड शहरातील काही भागाचा विद्युत पुरवठा सुरू होता, अशी माहिती आहे.

ग्रामीणांचीही वीज कार्यालयावर धावशनिवारी रात्री नागभीडसोबतच ग्रामीण भागाचाही विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. ग्रामीण जनताही या प्रकाराने क्रोधीत झाली होती. नागभीडचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला, याची माहिती सोशल मीडियावरून ग्रामीण जनतेस कळताच आमचाही विद्युत पुरवठा सुरळीत करा, या मागणीसाठी किटाळी, चिंधी चक येथील निवडक लोकांनी वीज कार्यालयावर धाव घेऊन विद्युत पुरवठा पूर्ववत करून घेतला.

 

टॅग्स :electricityवीज