महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ पदांच्या २७० जागांसाठी एमपीएससी राज्यसेवा सामाईक परीक्षा २०२० ची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झाली. त्यामुळे विद्यार्थी जोमाने परीक्षेच्या तयारीला लागले. जाहिरातीनुसार ही परीक्षा ५ एप्रिलला होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोनाना ११ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याची घोषणा झाली. परंतु, तेव्हाही परीक्षा पुढे ढकलून १४ मार्च करण्यात आली. सद्यस्थितीत रेल्वे विभाग, आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्यात येत आहे. परंतु, ऐन परीक्षेला तीन दिवस शिल्लक असताना पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्याने युवकांमध्ये नाराजी पसरली आहे.
बॉक्स
सहाव्यांदा परीक्षा पुढे ढकलली
आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार ही परीक्षा ५ एप्रिल रोजी होणार होती. मात्र कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलून २६ एप्रिल करण्यात आली. त्यानंतर १३ सप्टेंबर करण्यात आली. मात्र याच दिवशी नीट परीक्षा आल्याने या परीक्षेची दिनांक २० सप्टेंबर केली. मात्र त्यानंतर पुन्हा ११ ऑक्टोबर तारीख निश्चित करण्यात आली. त्यानंतर मराठा व ओबीसी आरक्षणामुळे पुढे ढकलून १४ मार्च करण्यात आली. आत पुन्हा २१ मार्च करण्यात आली आहे.
बॉक्स
परीक्षेसाठी हाॅल तिकीट दिले होते
एमपीएससी परीक्षेची तारीख प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगाने हाॅल तिकीट वेबसाईटवर जनरेट केले होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार जिल्हा केंद्र तर ज्या युवकांना केंद बदलविण्याची संधी दिली होती. त्यांना विभागीय स्तरावरील केंद्र दिले होते. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राचे स्थळही गाठले होते. परंतु, ऐन दोन दिवसांचा कालावधी असताना परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
बॉक्स
इतर परीक्षा होतात, मग एमपीएससी का नाही?
मागील दोन महिन्यांपासून रेल्वे विभागाच्या परीक्षा सुरळीत सुरू आहेत. त्यावर कुठलेही निर्बंध लादले नाही. मागील दोन महिन्यांपासून रेल्वे विभागाच्या परीक्षा सुरळीत सुरू आहेत. त्यावर कुठलेही निर्बंध लादले नाही.
आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवक, सिनिअर क्लर्क, ज्युनिअर क्लर्क, लॅब असिस्टन्स, टेक्निशन आदी पदांच्या परीक्षा घेण्यात आल्या. परंतु, एमपीएससी पुढे ढकलली. आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवक, सिनिअर क्लर्क, ज्युनिअर क्लर्क, लॅब असिस्टन्स, टेक्निशन आदी पदांच्या परीक्षा घेण्यात आल्या. परंतु, एमपीएससी पुढे ढकलली.
कोरोनाचे कारण देऊन एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परंतु, इतर विभागाच्या परीक्षा बिनादिक्त सुरू असल्याने रोष व्यक्त होत आहे.
कोट
राजकीय सभा, आंदोलन, मोर्चा, नेत्यांच्या मुलांचे थाटात लग्न करताना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती नसते. परंतु, एमपीएससी परीक्षा झाली तर कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, असा गोड गैरसमज सरकारचा झाल्याने परीक्षा पुढे ढकलल्या जात आहे.
-ऐश्वर्य लाकडे, सावली
कोट
एमपीएससीचे वेळापत्रक २०१९ ला जाहीर झाले. मात्र अद्याप परीक्षा झाली नाही. मुख्य परीक्षा, मुलाखत, जाॅइनिंगसाठी पुन्हा एक ते दोन वर्षांचा कालावधी लागू शक्यता आहे. एका परीक्षेसाठी पाच वर्ष वाया जात असल्याने विद्यार्थ्यात नैराश्य निर्माण होत आहे.
- श्रीकांत साव, चंद्रपूर
कोट
आयोगातर्फे परीक्षेच्या वेळापत्रकात सतत बदल होत आहे. एकीकडे परीक्षेच्या अभ्यासाचा तणाव, बेरोजगारीमुळे युवक त्रस्त आहेत. त्याबाबत उपाययोजना करण्याचे सोडून वारंवार परीक्षा समोर ढकलत आहे. मात्र यामुळे युवकाचे खच्चीकरण होत आहे.
-चेतन रामटेके, चंद्रपूर