शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील आदिवासींसाठी ‘अर्थ’ ठरतेय देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:21 IST

अर्थ (एज्युकेशन अ‍ॅक्शन रिसर्च इन ट्रायबल हेल्थ) ही संस्था सध्या जिवती तालुक्यातील आदिवासींच्या आरोग्य विकासावर कार्य करीत आहे.

ठळक मुद्देप्रेरणादायक : १२ आदिवासी पाड्यांवर आरोग्य, स्वच्छता व रोगनिवारणाचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : अर्थ (एज्युकेशन अ‍ॅक्शन रिसर्च इन ट्रायबल हेल्थ) ही संस्था सध्या जिवती तालुक्यातील आदिवासींच्या आरोग्य विकासावर कार्य करीत आहे. त्यामुळे ही संस्था आदिवासींसाठी देवदुतच ठरत असल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून ऐकायला मिळत आहे.या संस्थेचे संचालक डॉ. कुलभूषण मोरे हे मुळचे जिवती तालुक्यातील असल्यामुळे येथील आदिवासी लोकांच्या आरोग्याच्या समस्या त्यांना माहित आहेत. हा भाग डोंगराळ व अतिदुर्गम असून अनेक आदिवासी गुडे रस्त्याअभावी दुर्लक्षीत आहेत. त्यामुळे या गावात आरोग्याच्या अनेक समस्या आहेत.दूषित पाणी, कुपोषण, मलेरिया, त्वचारोग, क्षयरोग, साथीचे आजार यासोबतच सामाजिक आणि मानसिक आजार या आदिवासींच्या सर्व गोष्टी डॉ. कुलभूषण मोरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आशियातील सर्वोच्च असलेली राष्टÑीय ग्रामीण विकास संस्था हैदराबाद येथे पी. जी. इन ट्रायबल डेव्हलपमेंट हा जिवती येथील भागाचा संशोधन अभ्यासक्रम पूर्ण केला. यातून त्यांनी अर्थ संस्थेची १ आॅक्टोबर २०१३ ला स्थापना केली.अर्थच्या माध्यमातून आदिवासी गावात आरोग्य शिक्षण देणे, आरोग्याच्या प्रश्नांवर कृती आराखडा तयार करणे, त्यातून आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करून आरोग्याच्या बाबतीत संशोधण करणे आणि उपायोजन करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.याचसोबत येथील लोकांना स्वच्छता व आहाराबद्दल जनजागृती करणे, पाणी उकडून पिणे, रोज आंघोळ करणे, व्यसन न करणे, सकस आहार घेणे, व्यसनांचे दुष्परिणाम, गरोदर माता व स्तनदा मातांना आहारबद्दल माहिती व दवाखान्यात प्रसुती करण्याबद्दल प्रेरीत करणे अशा सर्व बाबींवर जनजागृती, संस्थेकडून केली जात असल्याने आदिवासी जागृत होत आहेत.अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कारडॉ. कुलभूषण मोरे यांची अर्थ संस्था जिवतीसारख्या अतिदुर्गम भागात आदिवासींसाठी चांगले कार्य करते. या त्यांच्या कार्याबद्दल डॉ. मोरे यांना या वर्षीचा अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार नागपूर येथे प्रदान करण्यात आला.आजपर्यंत आदिवासी गावात ‘अर्थ’ संस्थेने आरोग्य विभागाच्या सहकार्याने अनेक आरोग्य शिबिरे घेतली आहे. दंतरोग, त्वचारोग किंवा इतर अन्य आजारांवर ४०० ते ५०० लोकांना मोफत औषधोपचार झाला आहे. यासाठी इतर अनेक डॉक्टरांची मदत घेतली जाते. हे सर्व करीत असताना आई-वडील व पत्नी डॉ. नंदीनी मोरे यांचे आपणास नेहमी सहकार्य मिळते.- डॉ. कुलभूषण मोरेअध्यक्ष, अर्थ संस्था, जिवती.