शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

सळाखीत अडकलेल्या गर्भार कुत्रीच्या सुटकेसाठी धावला देवदूत

By admin | Updated: April 21, 2015 00:58 IST

तब्बल १२ तासांपासून ती जीवाच्या आकांताने विव्हळत होती. सळाखीत मान फसल्याने आणि फटीतून धड बाहेरही पडता येत

मृत्यूशी १२ तासांचा संघर्ष : तासभराचे जीवघेणे रेस्क्यूगोपालकृष्ण मांडवकर ल्ल चंद्रपूरतब्बल १२ तासांपासून ती जीवाच्या आकांताने विव्हळत होती. सळाखीत मान फसल्याने आणि फटीतून धड बाहेरही पडता येत नसल्याने पोटातील गर्भात चार-पाच पिल्लांचा पिंड घेऊन केविलवाणे ओरडत होती. अख्खा दिवस तापलेल्या उन्हात सुरू असलेली ही धडपड मरणपंथाला पोहचली, तरीही कुणी दयावान मदतीला धावला नाही. अखेर वन्यजीव आणि प्राणीमात्रांची कणव बाळगणारे प्रकाश कामडे धावले आणि जीवावर बेतून तासभर केलेल्या रेस्क्यू आॅपरेशननंतर तिची सहीसलामत सुटका केली.हा प्रसंग आहे चंद्रपुरातील रामनगर परिसरातील शेंडे प्लॉट नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका सुखवस्तु फ्लॅटलगतचा. या फ्लॅटच्या बांधकामाच्या वेळी संबंधित कंत्राटदाराने पायव्यापासून भिंत उभारताना फट तशीच ठेवून दिली. या फटीतून डोकावणाऱ्या सळाखीही तशाच बेवारसपणे सोडून दिल्या. आरामदायक फ्लॅटमध्ये माणसं राहायला आली आणि पायव्याच्या फटीचा आसरा बेवारस कुत्र्यांनी शोधला. अशातच एका गर्भार बेवारस कुत्रीने पिलांना जन्म देण्यासाठी हा ‘सुरक्षित’ आडोसा शोधला असावा. प्रवेश करताना ती आत पोहचली, मात्र बाहेर निघताना तिची मान पाण्याच्या पाईपखाली अडकली. रविवारी सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास अडकल्यापासून तिने सुटकेसाठी बराच प्रयत्न केला. मात्र ती पुन्हा पुन्हा अडकत गेली. तिचे विव्हळणे एकून फ्लॅटमधील आणि परिसरातील नागरिकही कुतूहलाने गोळा झाले. कुणी महानगर पालिकेला फोन केला. वनविभागातही फोन केला. तर कुणी दुरूनच गंमत पाहिली. पण मदतीला कुणीच धावले नाही. कुत्री एवढी फसली होती, की सर्वांनी तिची जगण्याची आशा सोडली. रात्री ९.३० वाजेपर्यंत ती अन्नपाण्यावाचून तशीच तळमळत होती. अशातच या परिसरात राहणारे वरिष्ठ भूवैज्ञानिक गजानन कामडे यांनी वन्यजीव आणि पक्षीमित्र असलेले त्यांचे लहान भाऊ प्रकाश कामडे यांना मोबाईलवरून माहिती दिली. ते वडगाव परिसरात राहतात. ही माहिती मिळताच त्यांना राहवले नाही. आपल्या १३ वर्षांच्या नकूल या मुलाला आणि २३ वर्षाचा पुतण्या सूरज यांना सोबत घेऊन कुदळ, फावडे, घमेला, टॉर्च घेऊन ते रात्री ९.३० वाजता दुचाकीने पोहचले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी बाजुच्या दुकानातून बिस्कीटे विकत घेतली आणि कुत्रीला चारली. पाणीही पाजले. ती फसली होती तिथे अंधार असल्याने टॉर्चच्या प्रकाशात काम सुरू केले. बराच प्रयत्न करूनही तिला बाहेर काढता येईना. दिवसभराच्या त्रासामुळे ती हिंसक झाली होती, त्यामुळे हातही लावता येईना. बचावासाठी टाकलेल्या काठी, कुदळीलाही ती चावा घेत होती. अखेर त्यांनी हिंमत बांधून आधी सभोवताची जमीन खोदली. खड्डा वाढवत तो कुत्रीपर्यंत पोहचविला. एकदाची खोल जागा तयार होताच तिची मान आणि पोट सळाखीतून सैल झाले आणि एकदाची तिची सुटका झाली. दिवसभराच्या मरणप्राय वेदनातून सुटका होताच ती हळूहळ बाहेर निघाली आणि दूर पळाली. कसलेही प्रशिक्षण नसताना केवळ स्वत:च्या हिंमतीवर कुत्रीचे प्राण वाचविणाऱ्या प्रकाश कामडे यांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकाचा ठरला आहे.