शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्या संस्कार केंद्र व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2016 02:00 IST

मुलांवर संस्कार करण्याचे काम अंगणवाड्यांच्या माध्यमातून होत असते. कोवळी पिढी घडविण्यच्या कामाची सुरूवातच

पंकजा मुंडे : दोन हजार अंगणवाड्यांना मिळाले रेडिओ स्पिकरचंद्रपूर : मुलांवर संस्कार करण्याचे काम अंगणवाड्यांच्या माध्यमातून होत असते. कोवळी पिढी घडविण्यच्या कामाची सुरूवातच अंगणवाड्यांमधून होत असल्याने राज्यातील सर्व अंगणवाड्यांना स्मार्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मुलांसोबतच गर्भवती महिला व स्तनदा मातांना संस्कारित करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका व मदतनिसांवर आहे. अंगणवाडया संस्काराचे केंद्र व्हावे व बालमनाला आकार देण्याचे काम आपण समर्पणाने करावे असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद व पावर ग्रीड कापोर्रेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंगणवाडी सेविकाकरिता कार्यशाळा व अंगणवाडी केंद्राना ट्रॉन्झिस्टर वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते तर प्रमुख पाहुणे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार अशोक नेते, आमदार नाना शामकुळे, संजय धोटे, बंटी भांगडिया, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, सभापती सरिता कुडे, देवराव भोंगळे, ईश्वर मेश्राम, पॉवर ग्रिडचे महाव्यवस्थापक एस.के .डंभारे, उपमहाव्यवस्थापक संजय वर्मा, श्री.के.प् ाालनिप्पन व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात मंत्र्यांच्या हस्ते रेडिओ व स्पिकरचे वितरण करण्यात आले. आकाशवाणी कार्यक्रमाची झलक या सिडीचे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना ना. मुंडे म्हणाल्या, राज्यातील अंगणवाड्या स्मार्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून पुढील दोन वर्षात सर्व अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत उपलब्ध करुन देण्यात येईल. अंगणवाडयांमध्ये दृकश्राव्य माध्यमांचा वापर करुन अभ्यासक्रम तयार करण्यात येणार असून शिक्षणासोबतच स्वच्छता अभियान, पर्यावरणाचे रक्षण, परसबाग संकल्पना, वृक्ष लागवड व शौचालय आदी बाबी यात समाविष्ट करण्यात येतील. म्हणूनच रेडिओ वाटपानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे अंगणवाड्यांना दूरदर्शन संच देण्याचा असणार आहे. शून्य ते सहा वर्ष वयोगटाच्या मुलांवरील संस्कार हीच देशाची संपत्ती असून आकाशवाणीच्या माध्यमातून जिल्हयातील दोन हजार अंगणवाड्यांमध्ये संस्कार करण्याचे काम केले जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. प्रत्येक अंगणवाडी व शाळा आदर्श करण्याचा संकल्प केला असून जिल्ह्यातील ६०० शाळा ई-लर्निंग करण्यात येतील. दर आठवड्याला आकाशवाणीचा एक तासाचा कार्यक्रम खास अंगणवाड्यसाठी सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ना. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने पावर ग्रीड या कंपनीच्या सी.एस.आर. निधीमधून दोन हजार अंगणवाड्यांना रेडिओ व स्पिकर्स देण्यात आले. आकाशवाणी चंद्रपूरच्या माध्यमातून प्रत्येक आठवडयात एक ते दोन तासाच्या कालावधीत अंगणवाडीतील बालकांसाठी, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी जागृतीपर कार्यक्रम प्रसारीत करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी यशदा पुणे येथील तज्ञ तसेच राज्यातील इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांची मदत घेण्यात येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सिरसे यांनी तर संचालन शीला जुमडे यांनी केले. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (जिल्हा प्रतिनिधी) मानधन वाढीची फाईल मंजूर - मुंडेना. पंकजा मुंडे म्हणाल्या, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सर्वसोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. अर्थमंत्र्यांच्या प्रयत्नाने अनेक वर्ष प्रलंबित असलेली मानधन वाढीची फाईल मंजूर झाली आहे. आदर्श अंगणवाडी तयार करण्यासाठी सोयीसुविधांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सेविका व मदतनीस यांचे मानधनासह सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपले सरकार कटिबध्द आहे.