शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतरही ग्रॅच्युइटीची प्रतीक्षाच, अंगणवाडी सेविकांच्या मागण्या कधी होणार पूर्ण?

By साईनाथ कुचनकार | Updated: April 6, 2023 15:30 IST

चंद्रपुरात पार पडली अंगणवाडी सेविकांची विदर्भस्तरीय बैठक

चंद्रपूर : अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युइटी लागू करा, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ग्रॅच्युइटीचा मुद्दा ज्यावेळी विधानसभेत गाजला तेव्हा चर्चेला उत्तर देताना महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युइटी देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन विधिमंडळात दिले. मात्र, अजूनही अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना त्वरित ग्रॅच्युइटी लागू करा, अशी मागणी चंद्रपुरात आयोजित अंगणवाडी सेविकांच्या विभागीय मेळाव्यात करण्यात आली.

चंद्रपूर येथे अंगणवाडी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची विदर्भस्तरीय बैठक पार पडली. यावेळी प्रा. रमेशचंद्र दहिवडे, पंजाबराव गायकवाड, भव्या देशकर, सुनंदा बावणे, छाया कागदेलवार आदींची यावेळी उपस्थिती होती. बैठकीला बुलढाणा, नागपूर, वर्षा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, १ मे रोजी विभागीय मेळाव्याचे आयोजन चंद्रपूर येथे करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी माया वाहाणे, बुलढाणा, कल्पना पटले गोंदिया, रंजना सावरकर वर्धा, सरिता आत्राम वडसा, चंदा मारिया नागपूर, जी. रमना उपस्थित होते.

दीर्घकाळापासून सेवा करणाऱ्या मदतनीसांना दहावीच्या आधारावरच पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. आपल्याला न्यायहक्क मिळवून घेण्याकरिता दीर्घ व व्यापक लढा आपण उभारला, पाहिजे. त्याच उद्देशाने विदर्भस्तरीय मीटिंगचे आयोजन केल्याचे यावेळी पंजाबराव गायकवाड म्हणाले. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक कल्पना पटेल यांनी केले. आभार संध्या खनके यांनी मानले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदchandrapur-acचंद्रपूर