शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी महिलांचा मेळावा

By admin | Updated: November 15, 2014 22:45 IST

येथे अंगणवाडी महिलांचा मेळावा वर्षा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून शारदा लेनगुरे, प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते.

दुर्गापूर : येथे अंगणवाडी महिलांचा मेळावा वर्षा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून शारदा लेनगुरे, प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात शकुंतला वर्मा म्हणाल्या, ‘अच्छे दिन आयेंगे’ चा नारा देऊन भाजपाने सामान्य जनतेला भुरळ पाडली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मात्र आम्हाला दिडशे दिवस लोटूनही दुर्बीन लावून देखील अच्छे दिन पहावयास मिळाले नाही. प्रा. दहीवडे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार हे स्वयंघोषीत विकास पुरुष आहेत. आता ते राज्याचे अर्थमंत्री झाले असून महाराष्ट्र राज्यांच्या तिजोरीच्या चाब्या त्यांच्या जवळ आल्या आहेत. असे ते भाषणात जनतेला सांगतात. या तिजोरीतील पैसा ते दुर्बल घटकांकरिता वापरणार की ज्यांनी त्यांना निवडणुकीसाठी पोषक आहार दिला होता, त्यांच्यासाठी वापरणार हे आपल्याला पहावयाचे आहे. कारण अंगणवाडी सेविका मदतनिस यांना राज्य शासनाकडून मिळणारे दोन हजार रुपये मानधन गेल्या चार महिन्यांपासून अंगणवाडी महिलांना देण्यात आले नाही. जुन्या सरकारने अंगणवाडी महिलांची फसवणूक केली होती आणि आता केंद्रात आणि राज्यात आलेले भाजपाचे नविन सरकार फसवणूक करणार असेल तर हे देखिल भांडवलदारधार्जीने सरकार आहे, असे आपल्याला म्हणावे लागेल. शारदा लेनगुरे म्हणाल्या, तत्कालिन केंद्र शासनाच्यावतीने ४५ वे श्रमसंमेलन बोलविण्यात आले होते. त्यावेळचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले होते. योजना कर्मचाऱ्यांना कामगारांचा दर्जा देण्यात यावा, किमान वेतन देण्यात यावे, सामाजिक सुरक्षा देण्यात यावी हे सर्व ठराव त्या संमेलनात मंजूर करण्यात आले त्या ठरावाचे काय झाले? असा सवाल त्यांनी केला.उपस्थितांचे आभार रेखा जुनघरे यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी लता मोटघरे, दीक्षा मोटघरे, कमल कांबळे, छाया लिहीतकर, सुशीला मेश्राम, सीमा गायधने, सुषमा तोडासे, सीमा टोंगे, भारती तिमांडे यांच्यासह अंगणवाडी महिलांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)