शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

...आणि नवरदेव पोहचलाच नाही

By admin | Updated: March 13, 2015 01:38 IST

जन्मोजन्मी सोबत राहण्याची त्यांनी शपथ घेतही. एकत्र राहून संसार थाटण्याचे स्वप्नही रंगविले. मात्र काही दिवसातच प्रेमविराने ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेऊन आपल्या प्रेयसिला फसविले.

ब्रह्मपुरी : जन्मोजन्मी सोबत राहण्याची त्यांनी शपथ घेतही. एकत्र राहून संसार थाटण्याचे स्वप्नही रंगविले. मात्र काही दिवसातच प्रेमविराने ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेऊन आपल्या प्रेयसिला फसविले. यानंतर तिने थेट पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसी खाक्यानंतर तो लग्नास तयार झाला. मात्र मंडपात पोहचलाच नाही. त्यामुळे वधुकडील मंडळींनी पुन्हा पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. ही घटना ब्रह्मपुरी येथे घडली.चंद्रपूर येथील प्रदीप भगवान मेश्राम (२८) याने ब्रह्मपुरी येथे संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केले. या केंद्रात दिव्या (काल्पनीक नाव) प्रशिक्षण घेण्यासाठी जायची. प्रशिक्षण सुरु असतानाच त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरु झाले. प्रेमामध्ये आणाभाका घेतल्या. एकत्र राहण्याची शपथ घेतली. दरम्यान प्रदिपला नोकरी लागल्याने तो मुळगावी परतला. त्यानंतर दिल्याने लग्न करण्याची गळ घातली. मात्र ‘तो मी नव्हेच’ ची भूमिका प्रदिपने घेतली. त्यानंतर आई-वडील आणि सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी दोघांना समज देवून लग्न जुळवून आणले. यासाठी वेळ, तारीखही ठरविण्यात आली. ठरल्यानुसार दिव्याच्या कुटुंबियांनी लग्नाची पूर्ण तयारी केली. नातेवाईकांनाही बोलावले. लग्नाची वेळ आली, सारे वऱ्हाडी नवरदेवाची वाट बघू लागले. मात्र प्रदिप आलाच नाही. त्यामुळे वधुकडच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी प्रदीप गेडामवर गुन्हा नोंदविला.