शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आणि मन्या मेंबर झाला !

By admin | Updated: August 10, 2015 00:43 IST

मतदारांचा कल केव्हा कोणाच्या बाजुने झुकेल याचा काहीच भरवसा नसतो. नागभीडच्या वॉर्ड नं. १ मध्ये तेच झाले.

नागभीड : मतदारांचा कल केव्हा कोणाच्या बाजुने झुकेल याचा काहीच भरवसा नसतो. नागभीडच्या वॉर्ड नं. १ मध्ये तेच झाले. निवडणुकीच्या आदल्या दिवशीपर्यंत कोणत्याही खिजगिणतीत नसलेला मन्या ढोकच्या बाबतीत एका रात्रीत आश्चर्य घडले आणि तो नागभीडचा मेंबर झाला.मन्या ढोक ! एक सामान्य माणूस. सांगेल त्याचे काम ऐकणारा. अशीच त्याची नागभीडभर ख्याती. या अगोदरही त्याने दोनदा नागभीड ग्रामपंचायतीसाठी नशिब अजमावले. पण बलाढ्य उमेदवारांसमोर त्याचा टिकाव लागला नाही. पण मन्याने आपले व्रत सोडले नाही. त्याच चिकाटीने तो लोकांच्या संपर्कात राहीला. पण जशी अगोदर त्याच्या नावाची चर्चा व्हायची, तशी चर्चा आता कोणी करीत नव्हते.अशातच यावेळची ग्रामपंचायतीची निवडणूक आली. दोन्ही पक्षांच्या बलाढ्य उमेदवारांनी दंड थोपटायला सुरूवात केली. या थोपटाथोपटीत मन्याचे नाव कोणीच घेत नव्हते. मन्यानेही पुर्वानुभव लक्षात घेवून या फंदात पाडायचे नाही, असे ठरवले आणि त्याचवेळी कोणाला तरी लक्षात आले की, समोरच्या उमेदवाराची मते कमी करावयाची असतील तर मन्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. झाले मन्याला लगेच तयार करण्यात आले. मन्याही तयार झाला आणि मन्याचे नामांकन भरण्यात आले. प्रचार सुरू झाला. दिग्गज उमेदवार त्यांच्या पद्धतीने प्रचार करू लागले. मन्याकडे पैसाही नाही अन् कार्यकर्तेही नाही. ‘एकला चलो रे’ अशी भूमिका मन्याने सुरू केली. घरोघरी जाऊन मतदारांना नमस्कार करणे हेच मन्याचे काम. निवडणुकीच्या पुर्वसंध्येपर्यंत मन्या फार तर १० ते २० मते घेईल, असाच अनेकांचा अंदाज. पण वॉर्डात ‘पब्लिक’ होती. ही ‘पब्लिक’ कोण काय करते याचेही निरिक्षण करीत होती. आणि याच पब्लिकने चमत्कार केला. इव्हीएम मशीनच्या माध्यमातून या पब्लीकने मन्याला एवढी मदत केली की, मन्याला नागभीडचा मेंबर करून दिले. (तालुका प्रतिनिधी)