शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

अमृत दीनदयाल मेडिकल स्टोअर्स गरिबांना वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:30 IST

समाजातील अंतिम घटकांचा विकास, सर्वांना समान न्याय देण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत....

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हा सामान्य रुग्णालयात २४ तास औषध सेवा सुरू

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : समाजातील अंतिम घटकांचा विकास, सर्वांना समान न्याय देण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत़ याच योजनांचा भाग म्हणून जिल्हा सामान्य रूग्णालयातून माफक दरात औषधी उपलब्ध करण्यासाठी अमृत दीनदयाल मेडिकल स्टोअर्स सुरू करण्यात आली़ ही सेवा गोरगरिबांना वरदान ठरणार आहे, असे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.याप्रसंगी आ. नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोगुलवार, डॉ. एम.जे. खान, डॉ. सोनरकर, अ‍ॅड. दत्ता हजारे, राजेश मून, राहुल सराफ, नामदेव डाहुले, डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. मुळे, डॉ. भुपेश भलमे, मनपा सभापती अनुराधा हजारे, दामोदर मंत्री रमेश मामीडवार, मोहन चौधरी आदी उपस्थित होते.ना़ अहीर म्हणाले, गरीब व सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात दररोज २४ तास या मेडिकल स्टोअर्समधून औषधी मिळणार आहेत़ यामध्ये ब्रॉन्डेड जेनेरीक औषधी, इम्प्लॉन्ट साहित्य, पेटेंटेड ड्रग्स, सर्जिकल साहित्य सुमारे ३० ते ७० टक्के सवलतीत उपलब्ध होणार आहे. रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला पाहिजे़ मेडिकलमध्ये औषधांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही ना़ अहिर यांनी यावेळी सांगितले़आ. शामकुळे म्हणाले, शासनाच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे़ सर्वांनी निरामय आरोग्यासाठी मेडिकलचा लाभ घ्यावा़ यावेळी आयसीएमआरमार्फत थॅलेसिमीया व सिकलसेल रूग्णांच्या तपासणीकरिता हिमोग्लोबिनोपॅथी तपासणी कक्षाचे उद्घाटन तसेच लॉयन्स क्लब, नागपूर कासमॉस बँकेद्वारा पुरस्कृत नवजात बालकांसाठी ब्लँकेटचे वितरण ना़ अहीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक रवी आसवानी, संजय कंचलार्वार, श्याम कनकम, नगरसेविका शीला चौहान, माया उईके, शितल आत्राम, चंद्रकला सोयाम, वंदना जांभुळकर, संदीप आगलावे, प्रमोद शास्त्रकार, पुनम तिवारी, संजय खनके, राजू घरोटे, शिवाजी सेलोकर, अशोक सोनी, श्रीकांत भोयर, गणेश गेडाम, जितेंद्र धोटे, राजू भास्करवार, विनोद बुध्दावार, शेख जुम्मन रिझवी, तेजा सिंह, सतिश दांडगे, राजेंद्र कागदेलवार, स्वप्नील बनकर, बंशीधर तिवारी आदी उपस्थित होते.