शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ंलिफाफ्यातील ‘त्या’ रकमेचे गूढ कायम

By admin | Updated: November 27, 2015 01:24 IST

गुरूवारी येथील ग्रामपंचायतीच्या आमसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी काही रक्कम असलेले लिफाफे सरपंचाला परत केले.

घुग्घुस : गुरूवारी येथील ग्रामपंचायतीच्या आमसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी काही रक्कम असलेले लिफाफे सरपंचाला परत केले. मात्र हा प्रकार काय आहे, याचा उलगडा झाला नाही. त्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे. याविषयावरून आमसेभात काही वेळ गोंधळ निर्माण झाला. गुरूवारी घुग्घुस ग्रामपंचायतीच्या झालेल्या आमसभेत विकासाचे नियोजन, अंदाजपत्रक मंजूर करणे, या बरोबरच तंटामुक्त अध्यक्षाची निवड करणे आदी विषय होते. दरम्यान सरपंचाने विरोधी सदस्यांना दिवाळीपूर्वी काही रक्कम असलेली पाकीटे पाठविली होती. मात्र सदस्यांनी आमसभेत रकमेची पाकीटे सरपंचांना परत केलीत. तीन महिन्यांपुर्वी काँग्रेस सत्तेवर आली. मात्र अद्याप कोणत्याही विकास कामाची सुरुवात झाली नाही. कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती बरोबर नसतानाही दिवाळी अग्रीम रक्कम त्यांना देण्यात आली नाही. उलट सरपंचाने विरोधी गटातील सातही सदस्यांना चार हजार रुपयांची पाकीटे कर्मचाऱ्यांकरवी का पाठविली आणि ती त्या सदस्यांनी कशी स्वीकारली, गुरूवारी झालेल्या आमसभेत त्या पाकीटातील रक्कम का परत केली, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. मात्र हा प्रकार नागरिकांनी गांभीर्याने घेतला. ती रक्कम कुठून देण्यात आली याची चौकशी करून खुलासा सत्तारूढ सरपंचाने व विरोधी सदस्यांकडून व्हावा अशी आग्रही मागणी नागरिकांकडून केली जात आहे एकूणच आजच्या सभेत घडलेल्या प्रकाराने नागरिकही अचंबित झाले आहेत. (वार्ताहर)