शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंबुजाची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:50 IST

उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीमुळे भूमीहीन झालेल्या आदिवासी व इतर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात विविध आंदोलन केले.

ठळक मुद्देएक सदस्यीय समिती स्थापन : प्रकल्पग्रस्तांची बाजू ऐकून घेतली

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीमुळे भूमीहीन झालेल्या आदिवासी व इतर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात विविध आंदोलन केले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे लेखी आश्वासन दिले आहे. तसेच उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) कल्पना ठुबे यांची एक सदस्यीय समिती चौकशीसाठी नेमली. दरम्यान या समितीने प्रहारचे जिल्हाप्रमुख, नगरसेवक पप्पू देशमुख व प्रकल्पग्रस्तांना मंगळवारी बोलावून चर्चा केली.आदिवासी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रहार संघटनेतर्फे प्रकल्पग्रस्तांचे उपोषण, मोर्चा, अंबुजाला गाव बंदी, ६० किमी पदयात्रा अशी विविध आंदोलन करण्यात आली. ज्याबाबत अंबुजाने न्यायालयाच्या स्तरावर आंदोलनाच्या विरोधात मागितलेल्या मनाई हुकूमाला न्यायालयाने नकार दिला. प्रहारने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी सोनापूर ते चंद्रपूर व्हाया गडचांदूर ‘शेतकऱ्यांची वारी कलेक्टरच्या दारी’ अशी ६० किमी पदयात्रा काढल्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक पवित्रा घेवून ठिय्या मांडला. दरम्यान जिल्ह्याधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन करुन चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, समितीने प्रहारचे जिल्हाध्यक्ष देशमुख व प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी सालेगुडा येथील लिंगू लचू कुमरे पाटील, सोनापूरचे सरपंच सुगंधा जुमनाके, उपसरपंच देवराव कोटनाके, जयवंत जुनघरे, प्रवीण मटाले, आकाश लोडे, सचिन पिंपळशेंडे, निखिल भोजेकर, घनश्याम येरगुडे, फिरोज खान पठान, दिनेश झाडे, सत्यपाल किन्नाके हे उपस्थित होते. यावेळी अंबुजाच्या भूमिअधिग्रहण व प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायाच्याविरोधात सप्रमाण आपले आक्षेप नोंदविले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार ४५ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रकरणाचा काय निष्कर्ष निघतो, याकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे.