शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंबुजा पाणी कराराने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे

By admin | Updated: December 4, 2014 23:05 IST

कोरपना तालुक्यात अमलनाला आणि नांदाफाटा पकडीगुड्डम ही दोन मोठी धरणे आहेत. पकडीगुड्डम धरणातील पाणी तालुक्यातील अंबुजा सिमेंट प्रकल्पाला देण्यात यावे, असा करार १९९८ मध्ये युती शासनाच्या

रत्नाकर चटप - नांदाफाटाकोरपना तालुक्यात अमलनाला आणि नांदाफाटा पकडीगुड्डम ही दोन मोठी धरणे आहेत. पकडीगुड्डम धरणातील पाणी तालुक्यातील अंबुजा सिमेंट प्रकल्पाला देण्यात यावे, असा करार १९९८ मध्ये युती शासनाच्या काळात झालेला आहे. हा करार करताना प्रथम प्राधान्य पिण्यासाठी, नंतर सिंचन व त्यानंतर उद्योगाला पाणी पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र परिस्थिती याहून उलट असून गेल्या काही वर्षापासून उद्योगाला पाणी मोठ्या प्रमाणात देण्यात येत असल्याने सिंचनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या धरणाअंतर्गत ३२०० हेक्टर जमिनीवर सिंचन होईल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ११०० ते १२०० हेक्टरवरच अनियमित सिंचन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा ५० टक्केही लाभ शेतकऱ्यांना घेताना दिसत नाही तर दुसरीकडे अधिकारी मात्र सिंचन झाल्याची आकडेवारी कागदावर रंगविताना दिसत आहे.या धरणाअंतर्गत नजिकच्या परिसरातील १७ गावांना पाठपुरावा करण्याचे निर्देश आहे. यासाठी विविध पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या.मात्र पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे पिपर्डा, धानोली, वडगाव, बेलगाव, आसन, माभा, सोनुर्ली या गावांनी धरणाचे पाणी सिंचनासाठीच द्यावे, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. तालुक्यात कापूस, सोयाबिन, तूूर, गहू, हरभरा व मिरची आदी पिक घेतली जातात. मात्र सिंचनासाठी पाणीच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची रब्बी पेरणी खोळंबत आहे. काही शेतातील नव्याने उगवलेली रोपे पाण्याअभावी कोमेजताना दिसत आहे. तालुक्यातील ४५००० हेक्टर एकूण पिक क्षेत्र असून केवळ चार ते पाच हजार हेक्टरवरच सिंचन दिसून येते. यामध्ये बोअरवेल, विहीर, नाल्यावरुन सिंचन करण्याऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हीच परिस्थिती अमलनाला धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांची झालेली आहे. सिंचनासाठी म्हणून ही दोन धरण बांधण्यात आली. परंतु सिंचन होत नसल्याने आता तीव्र भावना उमटताना दिसत आहे.