शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

झरण क्षेत्रात आश्चर्यकारक हातपंप

By admin | Updated: May 21, 2016 00:58 IST

जमिनीत पाण्याकरिता खोदलेल्या हातपंपाद्वारे जमिनीतील पाणी पंपाच्या हालचालीविना बाहेर उत्सर्ग होतच नाही.

पंपाची हालचाल बंद, तरीही २४ तास पाण्याचा उत्सर्ग सुरुवसंत खेडेकर बल्लारपूरजमिनीत पाण्याकरिता खोदलेल्या हातपंपाद्वारे जमिनीतील पाणी पंपाच्या हालचालीविना बाहेर उत्सर्ग होतच नाही. मात्र, एक हातपंप असेही आहे, ज्याला पंप हलविण्याची गरजच नाही. पंप न हलविताही पाणी आपोआप बाहेर येत आहे व ही क्रिया सतत २४ तास अखंडपणे सुरु आहे आणि तेही एक, दोन दिवस नव्हे तर पाण्याचा हा उत्सर्ग गेल्या २० वर्षांपासून जराही खंडीत न होता सुरु आहे. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तीनही ऋतूमध्ये पाण्याची सारखीच धार पडत आहे. हे आश्चर्यचकित करणारे हातपंप बल्लारपूर- गोंडपिपरी मार्गावरील निसर्गरम्य झरण या ठिकाणाहून सहा किलो मीटर अंतरावरील कन्हाळगाव या वनक्षेत्रात आहे. कन्हाळगाव हे वनग्राम वनविकास महामंडळाच्या मध्य चांदा वन प्रकल्पात येतो. वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी या प्रकल्पाला पत्रकारांसह नुकतीच भेट दिली. यावेळी वन अधिकाऱ्यांनी या हातपंप स्थळी नेऊन ही किमया दाखविली. या विषयी माहिती जाणून घेतली असता, पाण्याची या भागातील गरज भागविण्याकरिता सुमारे २० वर्षाआधाही वन विभागाने बोरिंग खोदले. त्यावर हँडपंपही लावला. मात्र, हँडपंप हलविण्याची गरजच कधी भासली नाही. आतील पाणी बोरिंगने आपोआप बाहेर येणे सुरु झाले. तेव्हापासून मोठ्या धारेने पाणी बाहेर पडणे सदोदित सुरुच आहे. हे पाणी शुद्ध तसेच चवदार आहे. रात्रंदिवस सारखे बाहेर पडणारे पाणी वाहून वाया जात आहे. बोरिंग जवळच टाके बांधून पाण्याची त्यात साठवण करुन या पाण्याचा वापर वृक्ष संवर्धनाकरिता करण्यात येईल, याबाबत निश्चित काही केले जाईल, असे चंदेल म्हणाले. कन्हाळगावच्या नागरिकांनी ‘लोकमत’ला या हातपंपाबद्दल माहिती देताना सांगितले की, कित्येक वर्षापासून पाण्याचा आपोआप उत्सर्ग सुरु आहे. हे कसे होत आहे, याचे आश्चर्य आम्हालाही आहे. काहीही न करता पाणीच पाणी निघतो हे एक आश्चर्यच!