शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

स्वच्छतेसोबतच कचऱ्याचीही विल्हेवाट लावावी

By admin | Updated: December 20, 2014 22:36 IST

ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर गडचांदूर नगरपरिषदेची प्रथमच निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून गडचांदूर शहरवासीयांच्या अपेक्षाही उंचावणे सहाजिक आहेत.

आशिष देरकर - गडचांदूरग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर गडचांदूर नगरपरिषदेची प्रथमच निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून गडचांदूर शहरवासीयांच्या अपेक्षाही उंचावणे सहाजिक आहेत. उमेदवारांना निवडून येण्याचे तर लोकांना विकासकामांचे डोहाळे लागले आहेत. नगरपालिकेने स्वच्छतेसोबतच कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.वाढत्या लोकसंख्येनुसार गडचांदुरात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. गडचांदुरात नगरपरिषदेचे सफाई कामगार स्वच्छता अभियान जरी राबवित असले तरी नियोजनाअभावी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात नगरपालिकेला मोठे अपयश येत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर तर होतच आहे, सोबतच पाळीव प्राणी, जनावरे मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन करीत आहे. त्यामुळे जनावराचेही आरोग्य धोक्यात आले आहे.गडचांदूर-कोरपना, गडचांदूर-लखमापूर व गडचांदूर-राजुरा या मुख्य रस्त्यांच्या कडेला शहरालगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे टाकण्यात येतात. ‘आतून स्वच्छ, बाहेर गलिच्छ’ असे दर्शन बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना नक्कीच होते. नगर परिषदेने उचललेला कचरा रोज पहाटे ट्रॅक्टरच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांवर टाकण्यात येतो. गडचांदूर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबरच कचऱ्याच्या प्रमाणातही फार वाढ होत आहे. घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावल्यास ‘स्वच्छ गडचांदूर, सुंदर गडचांदूर’ हे स्वप्न नक्कीच साकार होईल. मात्र त्यासाठी नगरसेवकांच्या इच्छाशक्तीची गरज राहणार आहे.सडलेला भाजीपाला व केरकचरा रोज रस्त्यावर टाकण्यात येतात. यावर नगर परिषदेने कसलेही निर्बंध आणलेले नाही. तसेच झोपडपट्टी भागातील कचरा नियमित उचलल्या जात नसल्याची ओरड आहे. झोपडपट्याही नगरपरिषदेचा भाग असल्यामुळे तेथील स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्याची मागणी गडचांदुरातील झोपडपट्टीवासीयांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)