शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्मीय विधूर महिला-पुरूष परिचय मेळावा

By admin | Updated: February 6, 2017 00:42 IST

येथील ह्युमन वेलफेअर मल्टीपर्पज असोशिएशनने भद्रावती येथे सर्व धर्मातील विधवा महिला व विधूर पुरुषांचा परिचय मेळावा आयोजित केला.

एका विवाहाचा मुहूर्त : ह्युमन वेलफेअर मल्टीपर्पजचा उपक्रमभद्रावती : येथील ह्युमन वेलफेअर मल्टीपर्पज असोशिएशनने भद्रावती येथे सर्व धर्मातील विधवा महिला व विधूर पुरुषांचा परिचय मेळावा आयोजित केला. त्याला सर्व धर्मातील गरजूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर येथील अ‍ॅड. फरहत बेग होते. मंचावर प्रमुख अतिथी आ. बाळू धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, चंद्रपूर महिला काँग्रेस कमेटीच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर आदी उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये शेकडो विधुर-विधवांनी परिचय दिला तर रामदास शंकर तंतरपाळे व अण्णपूर्णा बालकर यांचा विवाहसुद्धा पार पडला. यावेळी आ. बाळू धानोरकर म्हणाले की, ह्युमन वेलफेअर मल्टीपर्पज असोशिएशनने भद्रावती सारख्या लहान गावात सर्व धर्मातील विधूर असलेल्या महिला व पुरुषांचा परिचय मेळावा आयोजित करून चांगला उपक्रम राबविला. अशा कार्यक्रमाच्या कोणत्याही आयोजनाला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती आपण पुरवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.महिला काँग्रेस कमेटीच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे म्हणाल्या की समाजातील विधूर असलेल्या महिला-पुरुषांचे समाजात समायोजन करणे ही एक पुण्याची बाब आह‘, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, अ‍ॅड. फरहतबेग व सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर, अ‍ॅड. किशोर पुसलवार, मोहमंद जिलानी यांनीही आपआपले विचार मांडलेत. हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल उषा मून, सुधा पाचघरे, अनिता वनकर, किरण सूर्यवंशी, अमोल भगत, करुणा मेश्राम, वनमाला टिकले व सहकार्य केल्याबद्दल विशाल बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. संचालन सलमान मौशिम खान व उपस्थितांचे आभार मतीन शेख यांनी मानलेत.या मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता अल्का वाटेकर, इतिका शहा व मनिषा बोरकर यांनी अथक परिश्रम घेतलेत.(तालुका प्रतिनिधी)