शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
5
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
8
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
9
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
10
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
11
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
12
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
13
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
14
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
15
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
16
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
17
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
18
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
19
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
20
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार

जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी शहरात निघाली सर्वपक्षीय रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 23:53 IST

वरोरा जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी रॅली काढण्यात आली. यामध्ये अनेक प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होऊन जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : रॅलीत हजारो नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी रॅली काढण्यात आली. यामध्ये अनेक प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होऊन जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.वरोरा नगर परिषदेची निर्मिती सुमारे दीडशे वर्षांपूर्वी झाली. भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना वरोरा शहराचे भौगोलिक महत्त्व समजून त्यांनी व्यापार व उद्योगाच्या विस्तारीकरणाचे शहर म्हणून वरोºयाची निवड केली होती. अशा महत्त्वाच्या शहरालगत असणारे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे जगप्रसिद्ध आनंदवन, नागपूर-चंद्रपूर, यवतमाळ-कान्पा या दोन राष्ट्रीय महामार्गावरील केंद्रभागी असलेले प्रमुख ठिकाण व शैक्षणिक संस्थांचे जाळे, शासकीय कार्यालये, काही अंतरावरील ताडोबा व्याघ्र प्रकल्प, उत्तर-दक्षिण, मध्य-पश्चिम रेल्वेमार्ग, अतिरिक्त जिल्हसत्र न्यायालय, १५० बेडचे उपजिल्हा रुग्णालय, वर्धा नदी, अशा अनेक पूरक बाबींमुळे जिल्हा निर्मितीसाठी वरोरा सोयीस्कर ठिकाण आहे. त्यामुळे नवीन जिल्हा निर्मितीमध्ये वरोºयाला स्थान द्यावे, अशी मागणी मागील काही वर्षांपासून संघर्ष समितीकडून केली जात आहे. यासाठी निवेदन, साखळी उपोषण करण्यात आले होते. परंतु, शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे सदर मागणीकडे लक्ष वेधण्याच्या हेतूने गुरूवारी सर्वपक्षीय रॅलीचे आयोजन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. आमदार बाळू धानोरकर, नगराध्यक्ष अहतेशाम अली, पं. स. सभापती रोहिणी देवतळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोयर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंभुनाथ वरघणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन मत्ते, राकाँचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विलास नेरकर, अ‍ॅड. रोशन नकवे यांची प्रमुख उपस्थिती होती.रॅलीच्या सुरुवातीला प्रमुख वक्त्यांनी जिल्हा निर्मितीच्या मागणी उचलून धरली. आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या मार्गाने ही रॅली काढण्यात आली. प्रचंड घोषणा देत रॅली तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचली. उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. रॅलीमध्ये जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण धनवलकर, नगरसेवक राजू महाजन, प्रवीण सुराणा, मनीष जेठाणी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, बाबा भागडे, डॉ. हेमंत खापणे, लक्ष्मण गमे, डॉ. सागर वझे, समीर बारई, अ‍ॅड. विनोद जानवे, दादा जयस्वाल, अ‍ॅड. विजय पावडे आदींसह हजारो महिला व पुरुष सहभागी झाले होते. रॅलीच्या माध्यमातून मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, खासदार यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व अधिकाºयांकडे निवेदन पाठविण्यात आले.