शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभावी सेवेसाठी सर्व विभागाची हवी साथ

By admin | Updated: May 18, 2016 00:47 IST

रस्त्यावरील अपघात असोत की, शहरातील वाहतुकीचे प्रश्न, या सर्व ठिकाणी प्रभावी सेवा देण्याची धडपत आपला विभाग करीत असला तरी, ...

संदीप दिवाण : चंद्रपुरातील सेवेची वर्षपूर्तीचंद्रपूर : रस्त्यावरील अपघात असोत की, शहरातील वाहतुकीचे प्रश्न, या सर्व ठिकाणी प्रभावी सेवा देण्याची धडपत आपला विभाग करीत असला तरी, सर्व विभागांची साथ मात्र हवी, असा अपेक्षावजा सूर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी काढला. चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीेस अधीक्षक म्हणून एक वर्ष पूर्ण झाल्यानिमीत्त पत्रकारांनी त्यांची भेट घेतली असता, ते बोलत होते.चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर संदीप दिवाण जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपुरात वर्षभरापूर्वी बदलून आले होते. या वर्षभरातील कार्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्या असता ते म्हणाले, या वर्षभराच्या काळात गुन्ह्यांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न आपल्या विभागाने पुरेपूर केला. दारूबंदीमुळे ताण पडत असला तरी प्रभावी सेवा देण्याचा प्रयत्न आपल्या विभागाने सातत्याने केला. गुन्ह्यांचा उलगडा करून आरोपींना पकडण्यासाठी आपली धडपड असली तरी डॉ. जोगी हत्याकांडातील आरोपींना अद्यापही शोधता आले नाही, याची त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली. असे असले तरी विभागाचे प्रयत्न तेवढ्याच जोमाने सुरु असल्याचे ते म्हणाले. चंद्रपूर शहरासह भद्रावती, वरोरा आदी शहरात चोऱ्या वाढल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, तीन विभाग पाडून त्याची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे दिली आहे. सोबतीला तीन पोलीस निरीक्षक आणि शिपाई असे पथक आहे. या पथकाची गस्त आणि नाकाबंदी सुरू आहे. तरीही मर्यादा आहेतच. काल रात्री भद्रावतीमध्ये नाकाबंदी सुरू असताना अगदी फर्लांगावर चोरीची घटना घडली, असेही उदाहरण आहे. प्रभावी सेवा देण्यासाठी पोलिसाची धडपड असली तरी अन्य विभागांनीही आपल्या जबाबदाऱ्या उचलायला हव्यात. महानगर पालिकेकडे शहर वाहतूक अभियंत्याचे पद असते. मात्र आपल्याकडे नाही. मनपाने आॅटोंचे थांबे निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे भर रस्त्यांवर वाहन उभे करून ग्राहक शोधणाऱ्यांवर कारवाई करताना अडचणी येतात. गतीरोधकांची उंची कमी करण्याच्या आणि त्यावर रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचना बांधकाम विभागाला केव्हाच्याच मिळाल्या आहेत. मात्र अद्यापही पत्ता नाही, त्यामुळे अपघात घडतात. चंद्रपूर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याच्या मेंटनन्ससाठी महानगर पालिका निधी देणार होती. मात्र अद्यापही पैसा मिळालेला नाही. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यात पुढाकार घेऊन वायरलेट कॅमेरे लावण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसा प्रस्ताव आपण लवकरच पाठविणार आहेत. आगामी काळात जिल्ह्यात काही ठिकाणी नव्या पोलीस चौक्या आणि आऊट पोस्ट उभारण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविले जाणार आहेत. पोलिसांच्या वसाहतीचे कामही सुरू होणार आहे. चंद्रपुरात ३६४ क्वार्टरसाठी १०५ कोटी रूपये मंजूर आहेत. ते काम यंदा सुरू होणार आहे. २०१६-१७ या वर्षात ४०० सदनिका बांधल्या जाणार आहेत. भद्रावती, वरोरा, राजुरा, गडचांदूर येथेही पोलिसांसाठी घरे उभारण्याचा प्रस्ताव आहे. कार्यक्षम पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना वाव देण्याचा आपला प्रयत्न असतो. ठाणेदारांच्या रजा तात्काळ मंजूर करून कनिष्ठ अधिकाऱ्याला संधी देतो. त्यामुळे अधिकाऱ्यांमधील कार्यक्षमता वाढते, कार्यक्षम अधिकारी पुढे येतात. बिटात काम करणाऱ्या पोलिसांसाठी नवी कार्यपद्धती आपण आखत आहेत. त्यातून कामाचा वेग वाढेल. महाविद्यालये सुरू झाल्यावर जुलैपासून दामिनी पथक नव्या दमाने कार्यरत झालेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)वाहतूक पोलिसांप्रति एसपी संवेदनशीलचौकात उभे राहून ऊन्हवाऱ्यात सेवा देणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी काहीतरी करण्याची तळमळ पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी बोलून दाखविली. त्यांना पाण्याच्या बॉटल्स, छत्री, मास्क, पुरविण्याबद्दल ते विचार करीत आहेत. चौकात शक्य असेल, त्या ठिकाणी शेड उभारण्याच्या दृष्टीनेही त्यांची चाचपणी सुरु आहे.