शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सृष्टीतील सर्व जीवांना जगण्याचा समान हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:32 IST

मानवाप्रमाणेच सृष्टीतील प्रत्येक सुक्ष्म व महाकाय जीवांना जगण्याचा समान हक्क आहे. मानवाने मुख्य जनावरांची शिकार करण्याऐवजी प्राणीमात्रांवर प्रेम करुन पर्यावरणाचा समतोल राखणे ...

ठळक मुद्देगजेंद्र हिरे : वन्यजीव सप्ताहानिमित्त गोंडपिपरी येथे रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : मानवाप्रमाणेच सृष्टीतील प्रत्येक सुक्ष्म व महाकाय जीवांना जगण्याचा समान हक्क आहे. मानवाने मुख्य जनावरांची शिकार करण्याऐवजी प्राणीमात्रांवर प्रेम करुन पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी केले.गोंडपिपरी येथे वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत वनसप्ताह निमित्ताने आयोजित जनजागृती रॅलीला संबोधीत करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष संजय झाडे, उद्घाटक म्हणून उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार किशोर येरणे, उपनगराध्यक्ष चेतनसिंह गौर, उपस्थित होते.रानावनात मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राण्यांचा मानव वस्तीत शिरकाव यावर नगराध्यक्ष संजय झाडे यांनी उ्स्थितांना माहिती पटवून दिली. यावेळी स्थानिक नगरपंचायत कार्यालय जवळून रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रमात वन्यजीव संरक्षणात वनविभागाला विशेष सहकार्य करणाºया नांदगावचे पोलीस पाटील विभा खामणकर, प्रमोद गौरकार, प्रकाश खामनकर, विठ्ठलवाडाचे सरपंच मधुकर लखमापुरे यांचा सत्कार करण्यात आला.सदर रॅलीमध्ये आदिवासी साखरदेव वाद्य ग्रुप माडेआमगाव यांच्या विशेष पथकाने पारंपारीक आदिवासी नृत्य करीत रॅलीची शोभा वाढविली. सदर रॅली गोंडपिपरी- आलापल्ली मार्गाने निघून उपक्षेत्र वनविभाग कार्यालय येथे सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सचिन फुलझेले, प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एस. राऊतकर तर आभार क्षेत्र सहाय्यक नरेश भोपरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनरक्षक वेलमे, हेपट, ढुमणे, नैताम, जनता महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. पेंढारकर, पोलीस निरीक्षक प्रविण बोरकुटे व सहकारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.